रसिकांच्या स्वागताला करीनाचा 'मुजरा'

घाय़ाळ करणारी नजर, कातिल अदा, श्वास रोखून ठेवणारा करीनाचा हा लूक पाहूनच एजंट विनेदमधल्या करीनाच्या या मुजऱ्याची सारेच आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर करीनाच्या कोठीवरच्या या कातिल अदा साऱ्यांच्याच समोर आल्या.

Updated: Feb 10, 2012, 04:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

घाय़ाळ करणारी नजर, कातिल अदा, श्वास रोखून ठेवणारा करीनाचा हा लूक पाहूनच एजंट विनेदमधल्या करीनाच्या या मुजऱ्याची सारेच आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर करीनाच्या कोठीवरच्या या कातिल अदा साऱ्यांच्याच समोर आल्या.

 

करीनाने आपल्या अकरा वर्षांच्या करीअरमध्ये पहिल्यांदाच कोठीत आपला मुजरा सादर करण्याचं धाडस केलं आहे. करीना पर्सनल तसंच प्रोफेशनल लाईफमध्येही यश मिळवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असते आणि म्हणूनच कधी साईज झिरो करत बिकनी परिधान करते तर कधी साडी नेसून आपल्या पार्टनरला घायाळ करण्याचा प्रयत्न करते.

 

एजंट विनोदमधला हा मुजराही खास सैफसाठीच करीनाने केला आहे. कारण यात सैफचा पैसा, मेहनत सारंच आहे. आणि आपल्या एका मुजऱ्याने जर सिनेमाच्या चर्चेला हातभार लागणार असेल तर सैफसाठी तेही करायला करीना तयार झाली. कारण करीनाला चांगलंच माहिती आहे की आपल्या घायाळ अदांनी प्रेक्षकांचा कलिजा खलास होणार आहे.