रविना टंडनचं काय म्हणतंय मराठी..?

वयाला साजेशी अशी भूमिका रवीना टंडननं बुड्ढा होगा तेरा बाप मध्ये साकारली. आणि बॉलिवूडमध्ये दणक्यात कमबॅक केलं. या तिच्या सिनेमात तिनं आयटम सॉंग करुन सगळ्यांच्याच नजरा आपल्या कडे वळवल्या.

Updated: Jan 8, 2012, 10:44 PM IST

www.24taas.com

 

वयाला साजेशी अशी भूमिका रवीना टंडननं बुड्ढा होगा तेरा बाप मध्ये साकारली. आणि बॉलिवूडमध्ये दणक्यात कमबॅक केलं. या तिच्या सिनेमात तिनं आयटम सॉंग करुन सगळ्यांच्याच नजरा आपल्या कडे वळवल्या. आता या सिनेमानंतर रविनानं फुलफ्लेज ऍक्टींग करण्याचा चंगच बांधला आहे का असं विचारताच रविनानं आपल्या आगामी सिनेमांचीच लिस्टच आमच्या समोर मांडली.

 

आता गीन लिया आसमान या सिनेमाच्या निमित्तानं रविना मराठी बोलताना दिसणार आहे. दिग्दर्शक ऋषी देशपांडेंनी दिलेले मराठीचे धडे कुठपर्यंत आलेत ते सुद्धा आपल्याला कळणार आहे. मात्र महाराष्ट्रात वाढेलल्या रविनाला सिनेमाच्या निमित्तानं का होईना मराठी तोडकं मोडकं बोलता यायला लागलं म्हणजे मिळवलं. पण तिचा हा मराठी शिक्षणाचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य असाच आहे.

 

त्यामुळे रविना टंडन पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार असल्याने तिच्या चाहत्यांना तिला पाहण्याची पुन्हा एकदा सोनेरी संधी मिळणार आहे. त्यामुळे का होईना रविना मराठी देखील शिकत असावी