बोल्ड 'जिस्म-२'त दम नाही

नेहमी चर्चेत असलेला जिस्म-2 आज रिलीज झाला. हा चित्रपट रिलिज होण्याच्या अधिच अनेक कारणांनी गाजला. चित्रपटात काय दाखविले असेल उत्कंठा प्रेक्षकांना लागली होती. परंतु चित्रपटात सनी लिऑनचे काही हॉट सिन सोडले तर काहीच दम नसल्याचे स्पष्ट झाले.

Updated: Aug 3, 2012, 09:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

नेहमी चर्चेत असलेला जिस्म-2 आज रिलीज झाला. हा चित्रपट रिलिज होण्याच्या अधिच  अनेक कारणांनी गाजला. चित्रपटात काय  दाखविले असेल  उत्कंठा प्रेक्षकांना लागली होती. परंतु चित्रपटात सनी लिऑनचे काही हॉट सिन सोडले तर काहीच  दम नसल्याचे स्पष्ट झाले.

 

पॉर्न स्टार सनी लिऑनच्या लोकप्रियतेचा फायदा उठवून ही फिल्म तयार गेली आहे.त्यामुळे स्क्रिप्ट चांगली आहे किंवा नाही हे पाहीले गेले नाही. जिस्म 2 प्रदर्शित होणा-या चित्रपटगृहातील एकूण गर्दीपैकी ९० टक्के गर्दी ही सनी लिऑन  हॉट सीन पाहाण्याच्या उद्देशाने आलेली असावी. अशी आता चर्चा सुरू आहे. आजचा पहिलाच दिवस असल्याने प्रेक्षकांनी गर्दी केलेली दिसत होती.

 

जेवढं या फिल्ममध्ये बोल्ड सांगितलं  आणि पोस्टरच्या माध्यमातून दाखवू दिलं गेलं त्या प्रमाणात ही फिल्म बोल्ड नाही, असं चित्रपटाची नायिका सनी लिऑन म्हणते. त्यामुळे सनीची बोल्डची काय व्याख्या आहे, याचा अंदाज लावणे अवघड आहे. चित्रपटाच्या मध्यंतरानंतर दमच  दिसला नाही.  फक्त मसाला आहे. चित्रपटाचे छायाचित्रण चांगले असून स्टोरी मात्र कमजोर दिसून येत आहे.

 

या चित्रपटात इंटेलिजेंस ऑफिसर अयान (अरुणोदय सिंग) क्रिमिनल कबीरला  (रणदीप हुडा) पकडण्यासाठी इज्नाची(सनी ) मदत घेतो. आयान इन्जाकडून कबीरची माहिती घेण्याचा प्रयन्त करतो.परंतु सहा वर्षापूर्वी इज्ना कबीरची प्रेयसी असते. तेंव्हा कबीर पोलिसामध्ये काम करत असतो.यानंतर कबीर खूनी का बनला?  इज्नाचा काय रोल आहे? अयान नक्की कोण आहे? या सर्व प्रश्नांची ऊत्तरे शेवटी सापडतात.

 

चित्रपटाचा शेवटी सनी लियोन अरुणोदय सिंगच्या हातातुन मरते.परंतु ती मरता-मरता अरुणोदय सिंगला ही मारते. या चित्रपटात फक्त रणदीप याचा अभिनय चांगला आहे. अरुणोदय सिंग अभिनय करण्यात कमी पडलेले दिसतात.सनी लिऑन एक पॉर्न स्टार आसल्याने लोकं फक्त तिचा अभिनय पाहाण्यासाठी आले होते. परतु तीही  चांगला अभीनय करु शकली नाही.

 

या चित्रपटात सनी लिओन, रणदीप हुड्डा, अरुणोदय सिंग हे कलाकार आहेत.तसेच चित्रपट दिग्दर्शिका पूजा भट्ट निर्माता डीनो मोरिया आहेत. संगीत आर्को ,मिथुन आणि प्रावो मुखर्जी यांनी दिलेलं आहे.

 

चित्रपटातील फोटो पाहा..