बिपाशाचा पुन्हा देसी तडका

हॉट बिपाशा बासूने आपली सेन्श्युअस अदा सिल्व्हर स्क्रीनवर नेहमीच दाखवलीय. 'ओमकारा'मधलं तिचा 'बिडी जलइले'वाला जलवा प्रेक्षकांना खूपच भावला. त्यामुळेच आगामी 'झिला गाजियाबाद' मध्ये देसी तडक्यामध्ये बिपाशाच थिरकताना आपल्याला दिसणार आहे.

Updated: Dec 5, 2011, 06:22 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

हॉट बिपाशा बासूने आपली सेन्श्युअस अदा सिल्व्हर स्क्रीनवर नेहमीच दाखवलीय. मग ती कधी बोल्डनेसने तर कधी आयटम साँगमधून. 'ओमकारा'मधलं तिचा 'बिडी जलइले'वाला जलवा प्रेक्षकांना खूपच भावला. तिचा देसी तडका कायम रसिकांच्या स्मरणात राहील असाच होता.

 

त्यामुळेच आगामी 'झिला गाजियाबाद' सिनेमामधील देसी तडक्यामध्येही बिपाशाच थिरकताना आपल्याला दिसणार आहे. या सिनेमातील एका आयटम साँगसाठी बिपाशाच्या नावाची चर्चा होतेय. बिपाशादेखील हा आयटम नंबर करण्यासाठी उत्सुक आहे. सध्या आयटम नंबरची लोकप्रियता पाहता बिपाशा पुन्हा आयटम नंबरकडे वळलीय. आयटम नंबरमधूनही आपली लोक्रपियता वाढवता येते हे आता कतरीना आणि करीनाप्रमाणे बिपाशालाही चांगलंच उमगलेलं दिसतंय. काहीही असो मात्र यानिमित्ताने बिपाशाच्या आयटम नंबर्सचा देसी तडका अनुभवण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा.