'प्लेबॉय'साठी झाली नग्न, शर्लिनला हवाय 'भारतरत्न'!

‘प्लेबॉय’ मासिकासाठी शर्लिन चोप्राने नग्न फोटोशूट केल्यामुळे भारतीयांची मान शरमेनं खाली गेली असली तरी शर्लिन मात्र भलत्याच भ्रमात आहे. प्लेबॉयच्या मुखपृष्ठावर माझा नग्न फोटो पाहून माझ्या वडिलांना माझा अभिमानच वाटेल. असं तिने वक्तव्य केलं होतं. पण आता तर तिने हद्दच गाठली आहे.

Updated: Jul 29, 2012, 06:09 PM IST

www.24taas.com, मुंबई

‘प्लेबॉय’ मासिकासाठी शर्लिन चोप्राने नग्न फोटोशूट केल्यामुळे भारतीयांची मान शरमेनं खाली गेली असली तरी शर्लिन मात्र भलत्याच भ्रमात आहे. प्लेबॉयच्या मुखपृष्ठावर माझा नग्न फोटो पाहून माझ्या वडिलांना माझा अभिमानच वाटेल. असं तिने वक्तव्य केलं होतं. पण आता तर तिने हद्दच गाठली आहे.

शर्लिन चोप्राने आता ट्विटरवर वक्तव्य केलंय, “मी आंतरराष्ट्रीय मासिकात नग्न होऊन देशाची मान उंचावली आहे. याबद्दल माझा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मान करावा. मी हे गमतीत नाही तर मनापासून बोलत आहे.” शर्लिन चोप्राच्या ट्विटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

एवढंच नाही तर शर्लिनने असंही म्हटलं आहे की, मी प्लेबॉय मासिकासाठी फुकटमध्येही फोटोशूट केलं असतं. मीच स्वतःहून ‘प्लेबॉय’ मासिकाला ऑफर दिली होती की मी नग्न फोटोंसाठी तयार आहे. अर्थात ‘प्लेबॉय’ने शर्लिनला दिलेलं मानधन खरंतर नगण्यच असल्याचं सांगितलं जात आहे.