www.24taas.com, मुंबई
'गली गली में चोर हैं', या सिनेमाचे निर्माते नितीन मनमोहन यांना क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलनं सोमवारी चौकशीसाठी बोलावले.
या सिनेमाचा सहनिर्माता प्रकाश चंदानी यांचे बुकींशी संबंध असल्याचं उघड झाले असून त्यातून हिंदी सिनेमात बेटिंगचा पैसा वापरला जात आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर क्राईम ब्रांचनं नितीन यांची चौकशी केली. गली गली मैं चोर हैं,या सिनेमाचा सहनिर्माता याचे बुकी सोनू मालाडशी संबंध असल्याचे क्राईम ब्रांचच्या तपासात उघड झालं.
कांदिवलीत अटक करण्यात आलेल्या सोनूनं बुकी प्रकाश चंदानीक़डून बेटिंगच्या सूचना घेत असल्याची कबुली दिलीए. प्रकाश चंदानी हा सध्या दुबईत असून तो डी कंपनीसाठी काम करणा-या सुनील अभिचंदानी उर्फ सुनील दुबईच्या संपर्कात आहे. या पार्श्वभूमीवर नितीन यांची पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रॉपर्टी सेलमध्ये तासभर चौकशी झाल्याचे क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी सांगितलं.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="110300"]