दो दिल मिल रहे है....

नर्गिस फखरी आणि शाहिद कपूर यांचे सूत जुळल्याची बातमी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचली असेल. पण या दोघांची एकमेकांशी ओळख रणबीर कपूरने करुन दिली हे जर आम्ही सांगितलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

Updated: Mar 22, 2012, 08:22 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

नर्गिस फखरी आणि शाहिद कपूर यांचे सूत जुळल्याची बातमी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचली असेल. पण या दोघांची एकमेकांशी ओळख रणबीर कपूरने करुन दिली हे जर आम्ही सांगितलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. रॉकस्टारच्या शुटिंगच्या वेळेस रणबीरचं नाव नर्गिसशी जोडलं गेलं होतं. पण एका पार्टीत रणबीरने नर्गिसची शाहिदशी ओळख करुन दिली आणि त्यानंतर दोघांच्या हृद्यात व्हॉयलिनचे सूर वाजायला लागले ते अजुनही थांबलेले नाहीत. आता हे तर काहीच नाही नर्गिसने आपला मुक्काम शाहिदच्या घरी हलवला आहे.

 

रणबीर आणि शाहिदची मैत्रीही गेल्या काही दिवसातच जुळली. मकाऊ इथल्या झी सिने ऍवार्डच्य दरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यानंतर रणबीर आणि शाहिद खास मित्र बनले. शाहिदला रणबीरसोबत पहिल्या वर्ल्ड टूरचे आमंत्रणही देण्यात आलं होतं.नर्गिस आणि शाहिद हे आजकाल एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. शाहिदच्या गोव्यातील वाढदिवसाच्या पार्टीला हे दोघंजण तयारीसाठी एक दिवस आधी पोहचले.

 

रणबीर हा कपूर असल्यामुळे घराण्याचा वारसा दमदारपणे चालवत आहे. रणबीरचे नाव परत एकदा कतरिनाशी आणि दीपिकाशी जोडले गेलं आहे. कतरिना आणि रणबीर यांच्यात परत एकदा प्रेमसंबंध निर्माण झाल्याच्या चर्चांना जोर आहे तर अयान मुखर्जीच्या नव्या सिनेमाच्या सेटवर दीपिकाशी मैत्रीचे तुटलेले धागे परत एकदा जुळायला लागले आहेत.

 

सध्या शाहिद नर्गिसच्या प्रेमात आकंठ बुडाला असला तरी या दोघांनी नेहमीप्रमाणे तसं काही नसल्याचा खुलासा केला आहे. पण त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींनी मात्र दोघांच्या रिलेशनशीप बद्दल दुजोरा दिला आहे.