काय चाललंय बॉलिवूड विश्वात

राजस्थान मधल्या एका गरिब कुंटुंबातल्या मुलाची सर्कस बघण्याची धडपड, देख इंडियन सर्कस या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर शेक्सपिअरच्या हॅम्लेट या कादंबरीवर आधारित सिनेमा आता बॉलिवूमध्ये बनतोय. आता तर सोनाक्षीही सज्ज झाली आहे सिनेमा बनवायला. राऊडी राठोडचं यश माझ्य़ा वाढदिवसाचं गिफ्ट असेल अशी स्वत:च्याच सिनेमाची भविष्यवाणी केलीय सोनाक्षी सिन्हानं. नक्की काय काय चाललंय ते पाहू या, बॉलिवूड विश्वात.

Updated: May 15, 2012, 11:21 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

राजस्थान मधल्या एका गरिब कुंटुंबातल्या मुलाची सर्कस बघण्याची धडपड,  देख इंडियन सर्कस या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर शेक्सपिअरच्या हॅम्लेट या कादंबरीवर आधारित सिनेमा आता बॉलिवूमध्ये बनतोय. आता तर सोनाक्षीही सज्ज झाली आहे सिनेमा बनवायला. राऊडी राठोडचं यश माझ्य़ा वाढदिवसाचं गिफ्ट असेल अशी स्वत:च्याच सिनेमाची भविष्यवाणी केलीय सोनाक्षी सिन्हानं. नक्की काय काय चाललंय ते पाहू या, बॉलिवूड विश्वात.

 

1. देख इंडियन सर्कस हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय.. राजस्थान मधल्या एका गरिब कुंटुंबातल्या मुलाची सर्कस बघण्याची धडपड आपल्या कॅमेरात कैद केलीय ती दिग्दर्शक मंगेश हाडवळेने.. टिंग्या या यशस्वी सिनेमाचा दिग्दर्शक असलेल्या मंगेश हडवळे  यांचा पहिल्या वहिल्या हा हिंदी सिनेमा आहे.

2. शेक्सपिअरच्या हॅम्लेट या कादंबरीवर आधारित सिनेमा आता बॉलिवूमध्ये बनतोय. अभिषेक बच्चन या सिनेमात प्रमुख भूमिका पटकवण्यात यशस्वी झालाय. आणि या सिनेमाची निर्मिती करतोय अभिषेकचा जिगरी दोस्त गोल्डी बहल...सध्या बोल बच्चन सोडल्यास अभिषेक कडे फारसे प्रोजेक्टस नाहीत. त्यामुळे आता हॅम्लेटवर आधारित सिनेमा करणार म्हंटल्यावर अभिषेकची कॉलर थोडीशी टाईट झालीय..

 

3. असिन झालीय बॉलिवूड निर्मात्यांची लकी मॅस्कॉट..  गजनी..रेडी... आणि आता हाऊस फुल टू असिनच्या प्रत्येक बॉलिवूड फिल्मनं 100 कोटींचा आकडा बॉक्सऑफिसवर पार केलाय.सिनेमाला यश आल्यानं हा योगायोग नसून असिनचा पायगुण आहे असं बॉलिवूडमध्ये तरी मानलं जातंय. तेव्हा आता बोलबच्चन हा असिन आणि अजय देवगणचा आगामी सिनेमा  100 कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी होतोय का हेच पहायचंय....

 

4. राऊडी राठोडचं यश माझ्य़ा वाढदिवसाचं गिफ्ट असेल अशी स्वत:च्याच सिनेमाची भविष्यवाणी केलीय सोनाक्षी सिन्हानं.. दबंग नंतर रिलीज होणारी राऊडी राठोड ही सोनाक्षीची दुसरीच फिल्म आहे. प्रभुदेवाचं दिग्दर्शन, अक्षयचा ऍक्शन पॅक्ड परफॉर्मन्स आणि सोबत सोनाक्षीच्या लटक्या झटक्यांचा तडका या सिनेमात प्रेक्षकांना पाहयाला मिळणार आहे.

 

5. रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांचा कोचाडायन या थ्रीडी सिनेमात रजनी आणि दीपिका यांच्यावर एक गाणं चित्रीत झालं. मात्र या गाण्यातल्या रोमॅन्टिक सिन्सना रजनीनं कात्री लावायला सांगितली... दीपिका त्यांच्या निम्म्या वयाची असल्यानं हे सीन्स करताना रजनीही कंफर्टेबल नव्हता..त्यामुळे कसे तरी हे सीन्स शूट तर झाले मात्र त्यानंतर रजनी यांनी या सीन्सना अखेर कात्री लावायलाच लावली.

 

6. बेबो सध्या बिझी आहे ती हिरॉईनच्या शुटिंगमध्ये..नुसती बिझी नाही तर करीना या सिनेमासाठी जीवतोड मेहनंतही करतेय.. नुकताच करीनावर या सिनेमात एक सीन शूट झाला आणि या सीनमध्ये तिला मोठ्यानं ओरडायचं होतं.. करीना या सीनमध्ये इतकी घुसली की दिग्दर्शकानं कट म्हंटल्या नंतंरही ती  जीवाच्या आकांतानं ओरडंतच राहिली. इतकंच नाही यामुळे करीनाचा घसा बसला.

 

7. चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत मानाचा समजला जाणारा व्ही शांताराम पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला... या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार चिन्मय मांडलेकरला गजर सिनेमासाठी मिळाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पाऊलवाट या सिनेमासाठी ज्योती चांदेकरने पटकावला. तर डॉ श्रीराम लागू यांना या सोहळ्यात व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

8.इंडियन आयडॉलचं नवं पर्व लवकरच सुरू होणारेय...यासाठी वेगवेगळ्या शहरातील स्पर्धकांनी सहभाग घेतलाय...यातील काही परफॉर्मन्स हे परीक्षकांना चकित करून गेलं. तर काहींमध्ये सच्चा गायक असल्याची चिन्हं दिसली.यात मुलीदेखिल मागे नव्हत्या त्यांनीदेखिल या मंचावर सुरेल सादरीकरण केलंय. एकूणच एक सुरेल मैफिल पुन्हा स्मॉल स्क्रीनवरील प्रेक्षकांना पाहायला मिळणार.

 

9. लक्ष्य या मालिकेने नुकतेच शंभर एपिसोड पूर्ण केल्येत त्यामुळे हा आनंद लक्ष्यच्या संपूर्ण टीमने केक कापून सेलिब्रेट केला.यावेळी सुचित्र बंदेकर, अशोक समर्थ आदिती शारंगधर यांच्यासह टीममधले अनेक कलाकार हजर होते. लक्ष्य मालिका येणा-या काळात आणखी चांगली कामगिरी करेल असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला.

 

10. मूर्ती लहान मात्र किर्ती महान असाच प्रत्य येतोय डान्स इंडिया डान्स या रिएलिटी शोमध्ये. या मंचावर एक से एक