आदित्य चोप्राची नवी ‘राणी’ कतरिना

हिंदी भाषा धडपणे बोलता येत नसतानाही कतरिना कैफ आज हिंदीतली आघाडीची अभिनेत्री बनली आहे. आता यशराज फिल्म्सने कतरिनाला तीन मेगा प्रोजेक्टसाठी साईन केलं आहे. कतरिना तिन्ही खान सोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सलमानसोबत एक था टायगरमध्ये तर आमिरबरोबर धूम 3 आणि शाहरुख खानसोबत एका सिनेमात कतरिना काम करणार आहे

Updated: Nov 26, 2011, 01:14 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

हिंदी भाषा धडपणे बोलता येत नसतानाही कतरिना कैफ आज हिंदीतली आघाडीची अभिनेत्री बनली आहे. आता यशराज फिल्म्सने कतरिनाला तीन मेगा प्रोजेक्टसाठी साईन केलं आहे. कतरिना तिन्ही खान सोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सलमानसोबत एक था टायगरमध्ये तर आमिरबरोबर धूम 3 आणि शाहरुख खानसोबत एका सिनेमात कतरिना काम करणार आहे. बॉलिवूडमधील तगडं प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्स सोबत कतरिना एव्हढं बम्पर डील कोणीही आजवर साईन केलेलं नाही. पण यामागे खास कारणही आहे. राणी मुखर्जीची जागा आता कतरिना कैफने घेतल्याचं यशराजमधल्या काहींचे म्हणणं आहे.

 

एकेकाळी राणी मुखर्जी आदित्य चोप्राची हॉट फेव्हरीट होती आता ती जागा कतरिनाने घेतली  आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील व्यवसायिक तज्ञांच्या मते कतरिनाचा झालेला उदय आश्चर्यकारक नाही. यशराज फिल्म्सच्या मेरे ब्रदर की दुल्हनचं व्यवसायिक यशाची शिल्पकार कतरिना आहे. कतरिनामुळेच मेरे ब्रदर की दुल्हन हीट झाली. या सिनेमामुळे कतरिनाने बॉलिवूडमधील आपलं स्थान बळकट केलं आणि त्यामुळेच ती एकमेव अभिनेत्री आहे की जिच्या सोबत आदित्यने तीन फिल्म्सचं डील केलं आहे. यशराज या तिन्ही फिल्म्सच्या निर्मितीवर 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यशराजच्या प्रवक्त्यानुसार कतरिनाची निवड ही स्क्रिप्टच्या निकषावर तसेच दिग्दर्शकाच्या पसंतीनुसार करण्यात आली आहे.