'अब्राहम' आणि 'बासू' कुठेही एकत्र न 'दिसे'...

जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांचं ब्रेक-अप झाल्याचं सर्वश्रुतंच आहे.. मात्र, आता तर या दोघांनीही एकमेकांना टाळायलाही सुरुवात केली. जॉन आणि बिपाशा... बॉलिवूडमधलं मोस्ट रोमॅण्टिक कपल.

Updated: Nov 29, 2011, 10:29 AM IST

झी २४ तास वेब टीम

 

जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांचं ब्रेक-अप झाल्याचं सर्वश्रुतंच आहे.. मात्र, आता तर या दोघांनीही एकमेकांना टाळायलाही सुरुवात केली.  जॉन आणि बिपाशा... बॉलिवूडमधलं मोस्ट रोमॅण्टिक कपल. कोणतंही अवॉर्ड फंक्शन असो किंवा पार्टी जॉन-बिपाशा एकत्रच दिसणार. या दोघांचंही एकमेकांशिवाय पान हलत नव्हतं. मात्र, कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आणि आता तर अवॉर्ड फंक्शनमध्ये नेहमी एकत्र हजेरी लावणारे हे दोघंही एकमेकांना टाळायला लागले.

 

नुसतेच टाळत नाहीत तर एकमेकांसमोरही हे येत नाही. नुकत्याच पार पडलेल्या या अवॉर्ड फंक्शनमध्ये याचाच प्रत्यय आला. एरव्ही बिपाशाच्या डान्सवर तिला उत्तम दाद देणाऱ्या जॉनने आता तर बिपाशासमोर जाणंही टाळलं. एकूणंच काय तर 10 वर्षांपासून असलेलं नातं या दोघांनीही आता तोडलं हेच या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं.