चैतन्याचा झरा म्हणजे पु.ल.

मराठी साहित्यातला चैतन्याचा झरा म्हणजे पुल. संगीतातला आनंद यात्री म्हणजे पुलं. रंगभूमीवरचा परफॉर्मर म्हणजे पुलं. पुलंनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप प्रत्येक ठिकाणी पाडली अर्थात ही त्यांना त्यांच्या चाहत्यांनी पाडायला लावली.

Updated: Nov 8, 2011, 06:22 PM IST
झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मराठी साहित्यातला चैतन्याचा झरा म्हणजे पुल. संगीतातला आनंद यात्री म्हणजे पुलं. रंगभूमीवरचा परफॉर्मर म्हणजे पुलं. पुलंनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप प्रत्येक ठिकाणी पाडली अर्थात ही त्यांना त्यांच्या चाहत्यांनी पाडायला लावली.

 

खऱ्या अर्थानं आनंदयात्री म्हणून ज्यांच्यापुढे अवघा महाराष्ट्र नतमस्तक होतो ते थोर साहित्यिक, उत्तम वक्ते, बेस्ट परफॉर्मर, गुणी संगीतकार, अप्रतिम दिग्दर्शक म्हणजे पी एल. पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे. वयाच्या 16व्या वर्षी पुलंचं लिखाण सुरु झालं आजोबा हरले या प्रहसनातून. त्यानंतर त्यांच्या सुरु झालेल्या लेखन प्रवासानं आपल्याला भरभरुन दिलं. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, हसवणूक, बिगरी ते मॅट्रीक यासारख्या पुस्ताकांतून पुलंच्या लिखाणाची अपूर्वाई सिद्ध झाली. त्यांचा निर्मळ विनोद कधी कुणाला खटकला नाही हे त्यांच यश होतं. सामान्य माणसाला भिडेल आणि डोळ्यात टचकन पाणी आणेल ही त्यांच्या विनोदाची ताकद होती.

 

व्यक्ती आणि वल्ली मधला अंतू बर्वा असो नारायण असो किंवा सखाराम गटणे असो त्यांच्या या व्यक्तिरेखांनी कोपरखळ्या मारत आपले डोळे पाणावले. अपूर्वाई पूर्वरंग मधून त्यांनी आपल्याला जगाचा प्रवास घडवला. जावे त्याच्य़ा देशा, गणगोत, खिल्ली ही साहित्याची पुरचुंडी म्हणजे मराठी वाचकांसाठी पर्वणीच ठरले. बटाण्याची चाळ,असा मी असामी, वा-यावरची वरात, याचे पुलंनी रंगभूमीवर प्रयोगंही केले. त्यावेळी त्यांच्यातला उत्कृष्ट पफॉर्मर समोर आला. शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच थक्क करणारं. ती फुलराणी सारखं नाटक म्हणजे मराठी रंगभूमीला दिलेली एक अप्रतिम कलाकृती.

 

साहित्याबरोबरंच पुल रमले ते चित्रपटात. 1947 साली पुलंचा पहिला सिनेमा आला तो म्हणजे कुबेर. तर गुळाचा गणपती हा सिनेमा सबकुछ पुलं म्हणून गाजला. त्यांची ही कारकिर्द एक होता विदुषक पर्यंत बहरली. संगीत म्हणजे पुलंचा जीव की प्राण. त्यांनी संवादिनी म्हणजे हर्मोनियमचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं होतं. वंसंतराव देशपांडे, पं भीमसोन जोशी या सारख्या दिग्गजांना त्यांनी समर्थपणे अनेकवळा साथ केली. संगीतदिग्दर्शनातंही पुलं रमले. आणिबाणीच्या काळात आपल्या लिखाणातून त्यांनी आणिबाणी विरुद्ध बंड केले. पसंगी त्यांच्यातला परखड वक्ताही पहायला मिळाला.

 

त्यांच्यावर मराठी माणसानं भरभरुन प्रेम केलं. त्याचीच कृतज्ञता म्हणून पुंली अनेक सामाजिक संस्थांना मदत केली. बाबा माटे, अनिल अवचट यांच्या संसस्थांना कोणाताही गाजावाजा नं करता पुलंनी सढळ हातानं मदत केली. यामध्ये पत्नी सुनीताबाईंनी त्यांना समर्थपणे साथ केली. त्यांच्या प्रयत्नातून पुल फाऊंडेशनची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा हा वुडहाऊस 12 जून 2000 साली आपल्यातून निघून गेला. मात्र त्यानं भरभरुन केलेली आनंदाची उधळण आजंही मराठी मनामनात साठून आहे.