कोरोनाविरुद्धच्या लढ्यात 'झी समूह' सहभागी, महाराष्ट्र सरकारकडे ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द

देशसेवेसाठी समर्पित असलेल्या झी समुहाने कोरोना व्हायरसविरुद्धच्या सरकारी लढाईत सहभागी होत महाराष्ट्र सरकारला ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द केल्या आहेत.

Updated: Jun 14, 2020, 10:13 PM IST
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात 'झी समूह' सहभागी, महाराष्ट्र सरकारकडे ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द title=

मुंबई : देशसेवेसाठी समर्पित असलेल्या झी समुहाने कोरोना व्हायरसविरुद्धच्या सरकारी लढाईत सहभागी होत महाराष्ट्र सरकारला ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द केल्या आहेत. यासोबतच इतर वैद्यकीय उपकरणेही मुंबई महापालिकेला देण्यात आली. मुंबईच्या बीकेसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ऍम्ब्युलन्सच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. 

'झी समुहाने आम्हाला उत्तम मदत केली आहे. ऍम्ब्युलन्स आणि वैद्यकीय उपकरणांमुळे आम्ही आणखी ताकदीने कोरोनाविरुद्ध काम करू,' अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे झी समुहाने 'झी फाईट्स कोव्हिड१९' मोहीमेच्या अंतर्गत मुंबई महापालिकेला ४६ ऍम्ब्युलन्स दान केल्या आहेत. 

झी समुहाने ४६ ऍम्ब्युलन्स, ५० हाय फ्लो हिटेड रेस्पिरेटरी ह्युमिडिटी फायर मुंबई महापालिकेला दिल्या. झी समुह देशभरात २०० ऍम्ब्युलन्स, १०० हायटेक इंटेन्सिव्ह केयर युनिट्स (आयसीयू), ४०,००० पीपीई कीट्सही सरकारला देणार आहे. 

राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही झी समुहाचे आभार मानले आहेत. झी समूह नेहमीच समाज कल्याण्याची काम करण्यात अग्रेसर असतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. 

कोरोना संकटाच्या काळात झी समूह देशसेवा करत आहे. झी समुहाकडून १० हजार प्रवाशांना एक महिन्यासाठी जेवण दिलं जाणार आहे. यासाठी देशभरात डेली फूड पॅकेट्स वाटण्याची योजना आहे. झी समुहाने आपल्या ३,४०० कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री केयर फंडामध्ये मदत करण्यासाठी प्रोत्साहित केलं. यासोबतच झी समुहानेही पीएम केयर फंडामध्ये मदत केली आहे.