मुंबई : विचार करा तुम्ही अशा व्यक्तीसोबत लग्न करत असाल जी व्यक्ती तुमचा अजिबातच आदर करत नसेल तर अशा व्यक्तीसोबत लग्न करण्यात काय अर्थ आहे.
तुम्ही आयुष्यात फक्त त्याची पत्नी म्हणून जगाल आणखी काहीच नाही. तर असं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे प्रेमात पडण्याअगोदर किंवा लग्नाचा विचार करण्याअगोदर काही गोष्टी जाणून घ्या. त्यामुळे लग्न करण्याअगोदर किंवा प्रेमात पडण्याअगोदर याचा विचार नक्की करा. पण जर तुम्ही एखाद्या मुलाला डेट करत असाल तर त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला नक्की कळेल. त्यामुळे तुम्ही डेट करत असलेल्या व्यक्तीच्या १५ सवयींकडे नक्की लक्ष द्या.
जी व्यक्ती तुमच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. ती व्यक्ती कायम तुमच्यावर या ना त्या कारणाने बंधन लादत असेल तर त्या नात्याचा एकदा विचार करावा. त्यामुळे ती व्यक्ती तुमच्यासोबत किती एकनिष्ठ आहे हे तुम्ही ओळखू शकता. आणि ही परिस्थिती कायम असते ना. खाजगी आयुष्यात तो कायम तुम्हाला टोकत तर नाही ना. पण त्याच्या या सवयींमुळे तुम्हाला रात्रीची झोप देखील नीट लागेल की नाही याचा विचार करावा. जर ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात सतत निगेटिव्ह फिलिंग आणत असेल तर याचा नक्की विचार करा.
ही व्यक्ती कायम प्राण्यांचा राग करत असेल तर सावधान… जी व्यक्ती भूतदया न दाखवता प्राण्यांचा राग करत असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही खऱ्या आयुष्यात काय अपेक्षा कराल. जर तुमचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम असेल आणि तुम्हाला प्राणी किंवा त्या व्यक्तीमध्ये एकाला निवडण्याची वेळ आली तर… त्यामुळे थोडा विचार करा. आणि जी व्यक्ती फक्त मुकं प्राणी म्हणून त्यांच्यावर प्रेम करत नसेल तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात किती चांगला असेल.
प्रत्येक नात्यांमध्ये काही बेसिक नियम असतात. आणि समोरची व्यक्ती हे नियम न पाळता फक्त ते तोडण्याचे प्रयत्न करत असेल तर तुम्ही काय करू शकता. आणि यावरून हेच स्पष्ट होतं की त्या व्यक्तीला त्या नात्याचा अजिबात आदर नाही. जर ती व्यक्ती कायम हे सगळे नियम मोडत असेल तर तुम्ही काय करू शकता. आणि हे कायम हेच दर्शवतात की या व्यक्तीला तुमच्यावर अजिबातच प्रेम किंवा आदर नाही.
ती व्यक्ती कायम दिलेलं वचन मोडत असेल तर तुम्ही थोडा विचार करा. आणि जर ती व्यक्ती वचन मोडत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला मुर्ख बनवत आहे. ती व्यक्ती तुम्ही काय विचार करता किंवा तुम्ही काय बोलता याचा विचार देखील करत नसेल तर त्या व्यक्तीच्या असण्या नसण्याने काय फरक पडणार आहे. आणि जर तो दिलेल वचन मोडून विसरत असेल तर त्याचा काय फायदा. तर ती व्यक्ती तुमच्यासोबत एक डबल गेम खेळण्यात यशस्वी होत असेल.
जर नात्यात कायम तुम्हाला दुजा भाव दिला जात असेल तर नक्की विचार करा. जर तुम्ही शेजारी बसून देखील ती व्यक्ती कायम व्हॉट्सअॅप किंवा फोनवर बिझी असेल तर त्या व्यक्तीच्या लेखी तुम्हाला दुय्यम स्थान आहे. त्यामुळे अशा व्यक्तीशी संवाद साधण्यात किंवा काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही.
तुम्ही ज्या व्यक्तीसोबत वेळ घालवताय ती व्यक्ती स्वतःच मत तुमच्यावर लादत असेल तर विचार करा. त्याचप्रमाणे विनाकारण तुमच्यात बदल करायला तुम्हाला भाग पाडत असेल तर या सगळ्याचा एकदा तरी विचार करा. त्या व्यक्तीचं म्हणणं हाच अंतिम निर्णय असेल तर तुमचं पुढील जीवन धोक्यात आहे.
कारण ही व्यक्ती प्रत्येकवेळी तुम्हाला कारण देत टाळत असेल किंवा वेळ देत नसेल तर विचार करा. ती व्यक्ती तुम्हाला दुय्यम स्थान देत असेल तर एकदा या नात्याचा विचार करा. ती व्यक्ती कायम तुम्हाला कारण देत टाळत असेल तर याचा नक्की विचार करा.
भांडण ही नात्यातला गोडवा धरून ठेवतात. पण या वादांना काही मर्यादा आहे. जीवन आणि नातं यामध्ये कायम तुम्हाला एक प्रकारची तडजोड करावी लागते. आणि ही तडजोड फक्त एका बाजूने नाही तर तुम्ही बाजूने केलेली कायम चांगली असते. जर ती व्यक्ती तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू जाणून न घेता विचार करत असेल किंवा वाद करत असेल तर तुम्हाला नक्कीच विचार करायला हवा.
तो खूप चांगला वक्ता असेल पण तो तुमच्यातील संवाद कायम तोडत असेल तर ते ठिक नाही. कारण संवाद हा दोघांकडून व्हायला हवा एकाकडून फक्त ऑर्डर दिली जाते त्यामुळे याचा एकदा विचार करा.
तर त्या नात्याला काहीच अर्थ नसतो. अनेकदा आपण आजूबाजूला व्यक्ती बघतो ज्या कायम खोटं बोलत असतात. एक खोटं बोलायला दुसरं खोटं आणि दुसरं खोट बोलायला तिसरं. अशावेळी नात्यामध्ये फक्त दुरावा निर्माण होतो. जर ती व्यक्ती नातं तोडण्यासाठी हेच कारण असेल तर खरचं याचा विचार करा.
प्रत्येक नात कितीही दोघांचं असलं तरीही एकमेकांना खाजगी स्पेस देणं गरजेचं आहे. कारण नातं हे कितीही एकमेकांसोबतच असलं तरीही प्रत्येकाला खाजगी आयुष्य आहे. याचा भान ठेवून स्वतंत्र आयुष्य जगण्यास मदत करणं गरजेचं आहे. पण ते होत नसेल तर विचार करावा.
तर तुम्ही सुरूवातीलाच थोडं सावध व्हा. कारण कुटुंबातून आपलं नातं अधिक खुलत असतं. आणि जर समोरच्या व्यक्तीला कुटुंबच पटत नसेल तर याचा विचार करण गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा कुटुंबामुळे पूर्ण होत असतो. त्यामुळे जर त्या व्यक्तीला नाती आणि आपली माणसंच नको हवी असतील तर विचार करा. ती व्यक्ती कुटुंबवत्सल कधीच होऊ शकत नाही.
समोरची व्यक्ती स्मोकिंग कधीच सोडू शकत नसेल तर थोडा विचार करा. कारण अनेकदा असं होतं की सांगून ही समोरची व्यक्ती सिगरेट सोडत नाही. कारण जर तुम्ही लग्न करणार असाल आणि ती व्यक्ती तुमचा आणि तुमच्या भविष्याचा विचार करत नसेल तर त्या नात्याचा काय फायदा
ती व्यक्ती कायम छोट्या छोट्या वादावरून भांडण करत असेल तर थोडा विचार कराल. ती व्यक्ती कायम संवाद साधण्यापेक्षा संवाद तोडत असेल तर थोडा विचार कराल. तर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही.
हात उगारणं ही गोष्ट शुल्लक नाही त्यामुळे जर तुमचं लाईफ पार्टनर अशी कृती करत असेल तर थोडं थांबा आणि विचार करा. कारण मारहाण करणं ही गोष्ट सामान्य नाही. संवाद साधून कोणतीही शुल्लक गोष्ट सोडवू शकते.