बीडीडी चाळीच्या घरांचा प्रश्न अखेर सुटला, जितेंद्र आव्हाडांकडून हिरवा कंदील

काही स्थानिकांचा विरोध आहे, मात्र सर्वांचा विचार करूनच निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे.  

Updated: Jul 29, 2021, 09:06 PM IST
बीडीडी चाळीच्या घरांचा प्रश्न अखेर सुटला, जितेंद्र आव्हाडांकडून हिरवा कंदील title=

मुंबई : मुंबईतल्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या पायभरणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

1 ऑगस्टला या प्रकल्पाच्या पायभरणीचा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थितीत राहणार आहेत. 

वरळी पोलीस वसाहतीतील 2010 सालापर्यंतच्या पोलिस रहिवाशांना कायमस्वरूपी घर मिळणार आहे. त्यानंतरच्या पोलिस रहिवाशांना मात्र तिथे घर मिळणार नाही. काही स्थानिकांचा विरोध आहे, मात्र सर्वांचा विचार करूनच निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे.