महिला डॉक्टरचा भयानक कारनामा; नर्सिंग होममध्येच मांडला खरेदी विक्रीचा बाजार

उल्हाननगर येथे एक महिला डॉक्टरच बाळांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करत होती.  पोलिसांनी सापळा रचून या महिला डॉक्टरला अटक केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 17, 2023, 11:56 PM IST
महिला डॉक्टरचा भयानक कारनामा; नर्सिंग होममध्येच मांडला खरेदी विक्रीचा बाजार title=

Ulhasnagar Crime News : उल्हासनगर मधील एक डॉक्टरच नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्सिंग होममध्येच या महिला डॉक्टरने खरेदी विक्रीचा बाजार मांडला होता. पोलिसांनी या नर्सिंग होमवर धाड टाकत या महिला डॉक्टरचा कारनामा उघड केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. 

चित्रा चेनानी असे पोलिसांनी अटक केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. उल्हासनगर  कॅम्प नंबर 4 येथे कंवरराम चौक परिसरात हा प्रकार घडला आहे. येथे असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होम मधील डॉक्टर चित्रा चेनानी या आपल्या टोळीच्या माध्यमातून नवजात बाळाची खरेदी विक्री करत होत्या.

22 दिवसाच्या बाळाला विकताना रंगेहात अटक

महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये सुरु असलेल्या प्रकाराची सामाजिक संस्थांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकारचा पर्दाफाश केलाय. दरम्यान, नाशिकहून आलेल्या एका महिलेच्या 22 दिवसाच्या बाळाला सात लाखांना डमी ग्राहकाला विकताना ठाणे क्राईम ब्रांच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. 

मुली आणि मुलांचे वेगवेगळे रेट 

धक्कादायक म्हणजे मुली आणि मुलांचे वेगवेगळे रेट या महिला डॉक्टरने ठरविले होते. 22  दिवसांच्या बाळाची विक्री 7 लाखात होणार होती. दरम्यान महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील टोळी या बाळाची विक्री करणाऱ्या हे रॅकेटमध्ये सहभागी आहे. सध्या महिला बालकल्याण विभाग आणि क्राईम ब्रँच अधिकारी या सगळ्या घटनेची चौकशी करत असून लवकरच एक मोठ्या टोळीचा पर्दाफाश होणार आहे.

महापालिका रुग्णालयात डॉक्टर नसल्याने गर्भवची महिलेचा मृत्यू

महापालिका रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं गर्भवती महिलेला दुस-या रुग्णालयात हलवावं लागलं. मात्र यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार पुण्यात घडला होता. शुभांगी जानकर असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती 8 महिन्यांची गरोदर होती. गुरुवारी रात्री तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे तिला येरवड्यातल्या राजीव गांधी रुग्णालयात आठच्या सुमाराला नेण्यात आलं. मात्र त्यावेळी रुग्णालयात कोणीच डॉक्टर उपलब्ध नव्हते. म्हणून शुभांगी जानकर हिला ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.