महिलेला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी

महिलेचा विनयभंग करणाऱ्याला साकीनाका पोलिसांनी रविवारी अटक केली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 19, 2018, 05:04 PM IST
महिलेला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी title=

मुंबई : महिलेचा विनयभंग करणाऱ्याला साकीनाका पोलिसांनी रविवारी अटक केली.  सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी हा इसम देत होता. अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका महिलेकडे ३ महिन्यांपूर्वी तिच्या ओळखीची व्यक्ती आली होती. यानंतर या महिलेने त्याला पुन्हा घरी येऊ नये असं बजावलं, तरीही हा इसम त्रास देत होता.

महिलेला पळून जाण्याचाही सल्ला

हा इसम एवढ्यावरंच थांबला नाही, तर काही दिवसांपूर्वी तर या व्यक्तीने घरातून पळून जाऊ या, असे महिलेला सांगितले. त्यालाही या महिलेने नकार दिल्यानंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. 

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी

यानंतर या महिलेनी ही माहिती आपल्या नातेवाइकांना दिली, शनिवारी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला अंधेरी परिसरातून अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची दहा हजारांच्या जामिनावर सुटका केली.