मुंबई : मी राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही आणि अहमदनगर मतदारसंघात देखील जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. विखे कुटुंबियांबद्दल पवारांच्या मनात द्वेष आहे. वडिलांच्या बाबतीत त्याच जुन्या गोष्टी जर पवार साहेब पुन्हा काढत असतील तर का निवडणुकीचा प्रचार करावा. माझे वडील हयात नसताना देखील त्यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने दु:ख झालं. याबाबत मी पक्षश्रेष्टींना भेटून चर्चा करणार आहे. यानंतर पुढचा निर्णय घेईल. पक्ष मला सांगेल तिथे काँग्रेसच्या प्रचाराला जाईल. नगरमध्ये लागोपाठ ३ वेळा राष्ट्रवादीचा पराभव झाला. काँग्रेसला येथे संधी मिळाली पाहिजे होती. पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते माझ्या वडिलांबद्दल ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत ते त्यांना शोभत नाही. डॉ. सुजय विखे-पाटील यांचा निर्णय वैयक्तिक आहे. माझ्या बाबतीत माझ्या पक्षाचे हायकंमाड निर्णय घेतील. असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
अहमदनगर मी गेलो तरी त्यांना संशय येईल त्यामुळे मी नगरमध्ये प्रचाराला जाणार नाही. राजकारणात काही सीमा असतात. त्याचं उल्लंघन केलं तर त्यावर तडजोड करुन ती स्विकारली जाणार नाही. असं देखील विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याचा मोठा फटका आघाडीला बसणार आहे. अहमदनगरमध्ये विखे-पाटील यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहे.
पाहा काय बोलले राधाकृष्ण विखे-पाटील