Raj Thackeray : राज ठाकरे हिंदूजननायक का? मनसे कार्यकर्त्यांनी दिलं हे उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांचे 'हिंदूजननायक' असे पोष्टर, बॅनर्स सर्वत्र झळकले. मात्र, राज ठाकरे हे 'हिंदूजननायक' का याचे उत्तर मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरील पोस्ट करून दिलंय. 

Updated: Apr 28, 2022, 08:23 PM IST
Raj Thackeray : राज ठाकरे हिंदूजननायक का? मनसे कार्यकर्त्यांनी दिलं हे उत्तर  title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी मस्जिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांचे 'हिंदूजननायक' ( Hindu jannayk ) असे पोष्टर, बॅनर्स सर्वत्र झळकले. मात्र, राज ठाकरे हे 'हिंदूजननायक' का याचे उत्तर मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरील पोस्ट करून दिलंय. 

भोंग्याचा त्रास सर्वांना होतो. पण, त्याला वाचा कोणी फोडली राज साहेबांनी म्हणून ते हिंदूजननायक

रोज सर्वसामान्य हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम राज साहेबांनी केले. जनसामान्य हिंदूंचा एकमेव आवाज राजसाहेब म्हणून ते हिंदूजननायक आहेत.

रस्त्यावरची नमाज रोजच्या कामात अडथळे निर्माण होतात. पण, हा संताप व्यक्त केला राजसाहेबांनी म्हणून ते हिंदूजननायक

हिंदूंच्या सणांवर बंधने आणि मोहर्रमच्या मिरवणूकींना परवानग्या दिल्या गेल्या तेव्हा हिंदूसणांसाठी आवाज उठवला कोणी? तर राजसाहेब यांनी म्हणून ते हिंदूजननायक

गुजरातसारख्या राज्यातून हिंदूंनाही राजसाहेबांचा भोंग्याचा मुद्दा पटतो आहे. देशभरातील हिंदूंयुवकांचा आवाज झालेत म्हणून राजसाहेब हिंदूजननायक