मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेचे मोठे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 21 आमदार नॉट रिचेबल आहेत. या आमदारांशी शिवसेनेचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे
एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना अनेक दिवसांपासून उधाण येत होते. शिंदे यांच्यासह 21 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. परंतू नक्की शिंदे का नाराज आहेत यावर एक नजर...
1. उद्धव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे नाराज
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे सर्वात मोठे मंत्री आहेत. परंतू त्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र अदित्य ठाकरे यांना झुकते माप दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
2. आदित्य ठाकरेंकडे अधिक अधिकार असल्यानं नाराज
महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री असूनदेखील त्यांच्याऐवजी अदित्य ठाकरे यांना जास्त अधिकार असल्याने आपल्याला डावलले जात असल्याची भावना शिंदे यांची आहे.
3. निर्णय प्रक्रियेत स्थान न दिल्यानं नाराज
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिपदाचा तिजोरीसारखा वापर करण्यात येतो. परंतू पक्षाच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान न दिल्याने शिंदे नाराज आहेत.