देशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा

देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होती. 

Updated: Nov 3, 2022, 07:18 PM IST
देशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा title=
When will the countrys first bullet-train run Big revelation from rti nz

देवेंद्र कोल्हाटकर, झी मीडिया, मुंबई : देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होती. रेल्वेमंत्र्यांनी ही घोषणा गुजरात अहमदाबादच्या दौऱ्यावर असताना केली होती. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा अजूनही निश्चित नसल्याचे राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळ लिमिटेडने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कळविले. (When will the countrys first bullet-train run Big revelation from rti nz)

हे ही वाचा - कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळ लिमिटेडकडे यावर स्पष्टीकरण मागितले असता, महाराष्ट्र राज्यातील भूसंपादन पूर्ण झाल्यावर आणि सर्व निविदा/कंत्राट दिल्यानंतर ही कालमर्यादा निश्चित केली जाऊ शकते असं राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळ लिमिटेडचे उप महाव्यवस्थापक उमेश कुमार गुप्ता यांनी अनिल गलगली यांस कळविले.

हे ही वाचा - शिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर 

गुप्ता यांनी असेही सांगितले की डिसेंबर-2020 पासून गुजरात आणि दादरा नगर हवेली ( DNH ) मधील संपूर्ण 352 किमी लांबीचे नागरी काम वेगवेगळ्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. त्यांनी पुढे कळविले की 1 सप्टेंबर, 2022 पर्यंत, गुजरात राज्यात नागरी काम पूर्ण गतीने सुरू आहे. 

हे ही वाचा - पत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...

संपूर्ण गुजरातमधील सर्व सिव्हिल आणि ट्रॅक टेंडर्स आधीच देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात भूसंपादन सुरू आहे. अनिल गलगली यांच्या मते संपूर्ण नियोजन न करता जेव्हा असे महत्वाकांक्षी प्रकल्प घोषित केले जातात तेव्हा असे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही आणि कंत्राटादारांस अतिरिक्त रक्कम द्यावी लागते.