VIDEO : लग्न मंडपातील मित्रांचा अतिपणा नवरदेवाला भोवला...

मित्रांनी केलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद 

Updated: Jul 13, 2021, 01:18 PM IST
VIDEO : लग्न मंडपातील मित्रांचा अतिपणा नवरदेवाला भोवला... title=

मुंबई : लग्न जर आपल्या मित्र परिवारातील असेल तर त्या लग्नात आपला उत्साह वेगळाच असतो. या लग्नात प्रत्येकजण आपला पैसा देखील खर्च करताना मागे पुढे पाहत नाही. मात्र कधी कधी हा मोकळेपणा अधिक धोक्याचा असू शकतो. मित्रांचा अतिपणा नववराला अजिबात पटलेला नाही. (Wedding Video, Friends, Money, laundering, video, viral, social media) 

मित्राच्या कुटुंबात मजबूत पैसे खर्च केले 

इंटरनेटवर व्हायरल होणारा व्हिडीओ एका लग्नातील आहे. मंडपात नववधु आणि वर बसलेले असतात. यावेळी मुलाचे मित्र त्याच्या मागे उभे राहतात. आणि नववधु आणि वरावरतील पैसे उडवताना दिसतात. पैसे उडवणारा मुलगा हे बराच वेळ करत असतो. मंडपात होणाऱ्या या प्रकाराचा व्हिडीओ देखील बनवला जातो. मंडपातील अनेक लोक या प्रकाराकडे बघत असतात. या घटनेने नवरदेवाला राग येतो. जो त्याच्या चेहऱ्यावर चांगलाच दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yash Singh (@yashsingh4966)

पैसे उडवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल नवरदेवाचे मित्र अति उत्साहात असताना पैसे उठवताना दिसले. मित्राच्या लग्नाचा आनंद त्यांनी अशा पद्धतीने व्यक्त केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.