पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्तीसाठी वारकऱ्यांचे आंदोलन

 विठ्ठल रुक्मिणी समितीच्या निवडीपासून वारकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ही समिती बरखास्त करावी आणि राजकीय व्यक्तींऐवजी वारकरी प्रतिनिधी घ्यावेत या मागणीसाठी येत्या १० ऑक्टोबर २०१७ पासून मुंबईत आझाद मैदानावर वारकरी आंदोलन करणार आहे. 

Updated: Sep 8, 2017, 08:07 PM IST
पंढरपूर  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्तीसाठी वारकऱ्यांचे आंदोलन title=

मुंबई :  विठ्ठल रुक्मिणी समितीच्या निवडीपासून वारकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ही समिती बरखास्त करावी आणि राजकीय व्यक्तींऐवजी वारकरी प्रतिनिधी घ्यावेत या मागणीसाठी येत्या १० ऑक्टोबर २०१७ पासून मुंबईत आझाद मैदानावर वारकरी आंदोलन करणार आहे. 

१० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या आंदोलनात महाराष्ट्रातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून टाळमृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत आंदोलन करणार आहे. 

यापूर्वी मंदिर समितीची निवड झाल्यावर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वारकऱ्यांनी पंढरपुरात संतांच्या पालख्या प्रवेश न करता आंदोलन केले होते. आता पुन्हा या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करणार असल्याचे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले.