हजारो मतदारांची नावे दोन-तीन वेळा-काँग्रेसचा आरोप

मीरा भाईंदरमध्ये प्रभाग क्रमांक १० आणि १२ मध्ये मतदार यादीत हजारो नावे परत परत आल्याच समोर आलं आहे. 

Updated: Aug 17, 2017, 03:09 PM IST
हजारो मतदारांची नावे दोन-तीन वेळा-काँग्रेसचा आरोप title=

मुंबई : मीरा भाईंदरमध्ये प्रभाग क्रमांक १० आणि १२ मध्ये मतदार यादीत हजारो नावे परत परत आल्याच समोर आलं आहे.  सत्ताधारी पक्षाने प्रत्येक वार्ड मध्ये हजारो मतदारांची नावे दोन ते तीन वेळा मतदान यादीत समाविष्ट केली असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाकडे कॉंग्रेसने तक्रार करून, कारवाईची मागणी केली आहे. 

वार्ड १० मध्ये १५०० तर वार्ड १२ मध्ये १६०० नावे मतदार यादीत २ ते ३ वेळा आली आहेत. सत्ताधारी पक्षाने आपल्या उमेदवाराला जिंकण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे असा आरोप कॉंगेस उमेदवारांनी पुराव्यासह केला आहे.

तसेच अशाच बोगस मतदारांमुळे राष्ट्वादी चे लोकप्रिय आमदार विधानसभा हरले होते का? असा प्रश्नही कॉँग्रेलनं उपस्थित केला आहे. या प्रकरणाची लिखित तक्रार निवडणूक आयोग क्षेत्र कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयात दिल्याच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी सांगितलयं.