मुंबई : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका जरा शेतकऱ्यांना बसलाय तसाच तो सामन्यांनाही बसलाय. परतीच्या पावसामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. मुंबईतील भाजी मंडईत भाज्यांची आवक ही कमी झाली आहे. पावसामुळे भाज्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.
आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. कोबी १०० ते २०० रू. प्रती किलो, तोंडली ६० रू. प्रती किलो, फ्लॉवर ८० रू. प्रती किलो, काकडी रू. प्रती किलो, बटाटा ४५ रू. प्रती किलो, फरसबी आणि दुधी ८० रू. प्रती किलोने बाजारात उपलब्ध आहे.
ऐन दिवाळीच्या दिवसात परतीचा पाऊस झल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले. त्यांचा थेट परिणाम भाज्यांवर झाल्यांचं दिसून येत आहे. भाज्यांच्या भाव कडाडल्यामुळे ग्राहकांची देखील तारांबळ उडाली आहे.