मुंबई : बॉलिवूड अभिनेता SUSHANT SINGH RAJPUT सुशांत सिंह राजपूत यानं जून महिन्याच्या १४ तारखेला आत्महत्या केली. ज्यानंतर त्याच्या आत्महत्याप्रकरणी दर दिवशी एक नवी माहिती समोर येऊ लागली आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी अनेकांची चौकशी केली. हे सत्र सुरु असतानाच तिथं सुशांतच्या वडिलांनी त्यांची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआय़आर दाखल केली. ज्या धर्तीवर बिहार पोलीस मुंबईत धडकले. पण, मुंबईत मात्र त्यांना थेट क्वारंटाईन करण्यात आलं.
सध्या सुरु असणाऱ्या या सर्व घडामोडी आणि ज्या पद्धतीनं सुशांतचं आत्यमहत्या प्रकरण हाताळलं जात आहे ते पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी, अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. पण, संतप्त शब्दांत नाराजी व्यक्त करणं त्यांना महागात पडताना दिसत आहे. कारण, मुंबई पोलिसांना तिखट बोल लावणाऱ्या या ट्विटता आणि खुद्द अमृता यांना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी धारेवर धरलं आहे.
'मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !', असं ट्विट सरदेसाई यांनी केलं. तर, मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात तुम्ही कला सादर केल्याचं म्हणत, किती कृतघ्न होणार ? असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला.
ह्याच मुंबई पोलिसांच्या 'उमंग' कार्यक्रमात नाचलात - गायलात.
किती कृतघ्न होणार ???#WeTrustMumbaiPolice— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 3, 2020
अमृता फडणवीस या ट्विट करत नेमकं काय म्हणाल्या होत्या?
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं जात आहे, ते पाहता मला असं वाटतं की मुंबईने माणुसकीच गमावली आहे. इथं निरपराधांना राहणं आता सुरक्षित नाही, असं म्हणत मुंबईमध्ये पोलिसांकडून या प्रकरणी ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात येत आहे त्या बाबतीत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या याच ट्विटवर वरुण सरदेसाई यांनी उत्तर देत भरवसा नसल्यास, सुरक्षा कवच सोडून द्या असं म्हणत टीका केली.