मुंबई : शेतक-यांच्या मोर्चामध्ये विविध लोककला आणि लोकनृत्याचं दर्शन पाहायला मिळतं आहे. मजलदरमजल करत शेतकरी मुंबईच्या दिशेनं पोहचणार आहेत.
नाशिक-मुंबई प्रवासा दरम्यान लोकनृत्य सादर करत शेतकरी थकवा दूर करतायत. ठाण्यातही अशाच प्रकारच्या बावरी या आदिवासी नृत्याची झलक पाहायला मिळाली.
कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेला लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर धडकला आहे. आता शेतकरी आणि कष्टक-यांचा हा मोर्चा आता पुढच्या प्रवासाला निघणार आहे. शेतक-यांचा लाँग मार्च आता मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
पाहा व्हिडिओ