Bank Job: युनियन बँकेत शेकडो पदांची भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

Union Bank Job: युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 4, 2024, 06:04 PM IST
Bank Job: युनियन बँकेत शेकडो पदांची भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक title=
Union Bank Job

Union Bank Recruitment 2024: तुम्ही बॅंक भरती परीक्षांची तयारी करत आहात का? मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापकासह विविध पदे भरली जातील. एकूण 606 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. ऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन, स्क्रीनिंग किंवा मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

कसा कराल अर्ज?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.unionbankofindia.co.in/ वर जा. होमपेजवर तुम्हाला रिक्रूटमेंट सेक्शन अंतर्गत 'Union Bank Recruitment Project 2024-25 (Specialist Officers)' लिंकवर क्लिक करा. यानंतर 'Click Here to Apply' वर क्लिक करा. आता तुमचे लॉगिन डिटेल्स भरा. भरलेल्या अर्जाचे पेज डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या. 

महावितरणमध्ये नोकर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

अर्ज शुल्क 

युनियन बॅंकेतील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/ ईडब्ल्यूएस/ ओबीसी उमेदवारांकडून 850 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवाराकडून 175 रुपये शुल्क घेतले जाणार आहे. 

अर्जाची शेवटची तारीख 

3 फेब्रुवारीपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 23 फेब्रुवारी ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरी

मुंबई कस्टम्स अंतर्गत कार चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. उमेदवाराला वाहन चालक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच ड्रायव्हिंग परवाना असलेल्या उमेदवारांनाच ही नोकरी मिळू शकते. चालक पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई- 400001 या पत्त्यावर ऑफलाइन माध्यमातून पाठवायचे आहेत. 20 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.