उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या खास शैलीत अगदी संयमीतपणे ठाकरे यांनी सरकारला शालजोडी लगावली. तसेच, सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागतही केले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 7, 2017, 03:36 PM IST
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या खास शैलीत अगदी संयमीतपणे ठाकरे यांनी सरकारला शालजोडी लगावली. तसेच, सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागतही केले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

- जनतेच्या उद्रेकापुढे सरकार झुकले - उद्धव ठाकरे

- सरकारने ताबडतोब निर्णय घेऊन जनतेची दु:खे दुर करावीत - उद्धव ठाकरे

- पेट्रोल, डिजेलचे दर कमी करा, भारनियमन रद्द करा- उद्धव ठाकरे

- बदल करतो म्हणून जर जनतेकडून मते घेतली असतील तर, जनतेला बदल दिसलाच पाहिजे - उद्धव ठाकरे

- सरकार जर जनतेसोबत नसेल. तर आम्ही (शिवसेना) सरकारसोबत नाही. जनतेसोबत आहोत - उद्धव ठाकरे

- आता करात सवलत द्यायची होती तर, कर जमाच का केला- उद्धव ठाकरे

- जनतेच्या असंतोषाच्या झळा सरकारला बसू लागल्या आहेत- उद्धव ठाकरे

- सरकारने कमी केलेला कर ही दिवाळी भेट नाही. सरकारचा नाईलाज आहे - उद्धव ठाकरे

- चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सरकारसोबत आहोत- उद्धव ठाकरे

- सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर ज्या पटीत वाढवले त्या पटीतच कमी करा- उद्धव ठाकरे

- सरकारने थोडेसे खाली येऊन जनतेच्या भावना समजून घ्याव्यात- उद्धव ठाकरे

- विजेचे भारनीयमन कमी झालेच पाहिजे. लोकांच्या असंतोषाची सुरूवात झाली आहे- उद्धव ठाकरे

- जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका. उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा...

- कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात वीजकपात केली जात आहे. कोळशाचा तुटवडाच कसा निर्माण झाला? उद्धव ठाकरे

- जनता एकवटली की, सत्ताधारी कितीही मोठा असू दे. ती त्याला झोपवायला कमी करत नाही- उद्धव ठाकरे

- सरकारने जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये- उद्धव ठाकरे