Uddhav Thackeray : शिवसेना (Shiv Sena) फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. आज ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला (Uttar Bhartiy Melava) हजेरी लावणार आहेत. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून आता उत्तर भारतीय व्होट बँक मजबुतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी 5 वाजता गोरेगावच्या नाहर निकेतनमध्ये उत्तर भारतीयांना संबोधित करणार आहेत. मुंबईतील विविध समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. (BMC Election)
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्ष लागले असून शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी गुजराती आणि जैन समाजाशी संवाद साधला होता. आता ते उत्तर भारतीय व्होटबँकेच्या दिशेने मोर्चा वळवलाय. उद्धव ठाकरे आज गोरेगावात उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने याला खूप महत्व आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्या आजच्या कार्यक्रमाकडे पाहिलं जात आहे.
दरम्यान, याआधी शिवसेना युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. या भेटीमागे राजकीय गणिते जुळविण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितले जात होते. परंतु मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही भेट झाल्याची अधिक चर्चा आहे.
आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या या भेटीनंतर आता उद्धव ठाकरे आज उत्तर भारतीयांशी संवाद साधणार असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.