Crime News : धक्कादायक! 50 वर्षाच्या मामाचा भाचीवर लैंगिक अत्याचार; भावाचाही सहभाग असल्याचे समोर

Crime News : प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या 4 तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. यासोबतच आरोपींवर पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Feb 12, 2023, 12:19 PM IST
Crime News : धक्कादायक! 50 वर्षाच्या मामाचा भाचीवर लैंगिक अत्याचार; भावाचाही सहभाग असल्याचे समोर title=

Crime News : मुंबईच्या (Mumbai News) बोरिवलीतून नात्याला काळीमा फासणारी अशी घटना समोर आली आहे. बोरिवली (Crime News) परिसरात मावशीच्या घरी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भाऊ आणि मामाने अनेकदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलीने या घटनेची माहिती तिच्या विरार येथील काकांना दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने  विरार पोलिसांत तक्रार दाखल विरार पोलिसांनी हे प्रकरण मुंबईतील एमएचबी पोलिस ठाण्यात वर्ग केले. त्यानंतर माहिती मिळताच चार तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी मामाचे वय 50 वर्षे आणि चुलत भावाचे वय 19 वर्षे आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा (POCSO) आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376, 376 (2) (n), 376 (2) (f) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दुसरीकडे, दीड वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या पेल्लार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यातील आरोपी गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांसोबत खोटे बोलून वेळोवेळी राहते घर बदलून कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती मिळताच पेल्हार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

तांत्रिक तपासात आरोपी बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालवणी मंडळात फिरत असल्याचे समोर आले असून तो रिक्षाचालक असावा असा अंदाज असून तो गणेश नगर परिसरात राहत असल्याचीही माहिती मिळाली आहे. आरोपी आल्यानंतर पोलीस पथक तेथून निघून गेला होता. मात्र आरोपी पहाटे पाच वाजता गणेश नगर, लालजी पाडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांना मिळाली. कांदिवली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांनी एटीसी पथक तसेच गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांसाठी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.