Uddhav Thackeray on Fadnavis : 'देवेंद्रजी तुमच्या वजनाने बाबरी पडली असती'

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईच्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Updated: May 14, 2022, 09:23 PM IST
Uddhav Thackeray on  Fadnavis : 'देवेंद्रजी तुमच्या वजनाने बाबरी पडली असती' title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईच्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'देवेंद्र फडणवीस यांना एक विचारायचं आहे, तुमचा पक्ष जेव्हा नव्हता, आमचा ही नव्हता , पण तुमची जी मातृसंस्था आहे संघ, जिला आता दोन तीन वर्षात शंभर वर्ष पूर्ण होतील. त्यांचं स्वांतत्र्य लढ्यात योगदान काय?' (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis and BJP)

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'स्वातंत्र्यपूर्व काळास संघ अस्तित्वा होता, पण एकदाही संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरलेला नाही, असेल तर बातमी दाखवा. तुमचा आणि स्वातंत्र्याचा संबंध काय, संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा सुरु होता, त्या लढ्यातही नव्हतात. त्या लढ्यात जनसंघ म्हणून होतात, शिवसेनाही नव्हती पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे  काका श्रीकांत ठाकरे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांना मदत करत होते. तेव्हा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु होता त्यातले पहिले पाच सेनापती होते, त्यातले एक म्हणजे प्रबोधनकार ठाकरे होते.'

'संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली पण यातून पहिले बाहेर पडले ते म्हणजे जनसंघ. आणि तेही जागेवरुन. तेव्हापासून मुंबईचे लचके तोडण्याचा यांचा मनसूबा आहे हा वेळीच लक्षात घ्या.' असं ही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

'हिंदुत्वाचा खोटा बुरखा घालणारा पक्ष आता देशाला भरकवटत आहेत. गदा पेलायला हातात ताकद पाहिजे.' 'तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. हे मनोरुग्ण आहेत. ज्यांच्यावर विश्वास टाकला तेच केसाने गळा कापणार होते तर विश्वास कोणावर दाखवायचा.' असं ही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

'हिंदुत्व हे सोडण्याची आणि नेसण्याची गोष्ट नाही. तुमच्यासारखा सारखी सकाळची शपथ घेतली नाही. काँग्रेससोबत उघड गेलो, तुमच्या सारखं सकाळचं गेलो नाही.'

'एनडीएतले किती सहकारी हिंदू म्हणून तुमच्यासोबत आले होते? आज जे काश्मिरमध्ये सुरु होतं, हे त्यावेळीही सुरु होतं. त्यावेळी याच बोगस हिंदुत्वावादी भाजपने मुफ्ती मोहम्मद सईदबरोबर सरकार स्थापन केलं होतं. मुफ्ती मोहम्मद सईद किंवा मेहबुबा सईद काय भारत माता की जय बोलतात, की तुमच्या कानात वंदे मातारम बोलतात.'

'पण मुफ्ती मोहम्मद यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती, तुमचा मंत्री त्यांच्या सोबत होता, तेव्हा त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं होतं, की काश्मिर खोऱ्यातील निवडणुका शांततेत पार पडू दिल्या म्हणून मी पाकिस्तान, हुरियत आणि दहशतवाद्यांना धन्यवाद देतो. हे तुमचं हिंदुत्व.'

'बाबरी पाडताना ते म्हणतायत शिवसैनिक नव्हते. फडणवीस म्हणतात मी गेलो होतो तिकडे, तेव्हा तुमचं वय काय होतं, काय शाळेच्या सहलीला गेला होतात. चला चला चला अयोध्येला चला. असं काय होतं का?'

'तुमचं वय काय, बोलता काय, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलंय. देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने पडली असती. मग लोकांना श्रमच करावे लागले नसते.'