'संजय राऊतांसह इतरांना क्वारंटाईन केव्हा करणार?'

भाजप नेत्यांची थेट आरोग्यमंत्री आणि ठाकरे सरकारकडे मागणी

Updated: Nov 25, 2020, 06:33 PM IST
'संजय राऊतांसह इतरांना क्वारंटाईन केव्हा करणार?' title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या ED ईडीच्या धाडी राजकीय वर्तुळात खळबळ माजवत आहेत. त्यातच काही अनपेक्षित नावं पुढं येत असल्यामुळं सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्षही पेटताना दिसत आहे. 

आरोप प्रत्यारोपांच्या याच सत्रात आणि प्रताप सरनाईक ईडी चौकशी प्रकरणात आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक अजब मागणी केली आहे. किंबहुना त्यांनी ही मागणी करत थेट राज्याचे आरोग्य मंत्री आणि ठाकरे सरकारला उद्देशून पत्रच लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी shivsena शिवसेना नेते संजय राऊत आणि इतरांना quarantine क्वारंटाईन करा असं न केल्यास त्यांना केव्हा क्वारंटाईन करणार असा प्रश्नार्थक सूर आळवला आहे. 

'महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मी पत्र लिहित विचारणा केली आहे की, मंगळवारी pratap sarnaik  प्रताप सरनाईक यांची भेट घेतल्यामुळं सुरक्षितता आणि सावधगिरीचं पाऊल म्हणून ठाकरे सरकारनं संजय राऊत आणि इतरांना क्वारंटाईन केलं असेलच', असं ट्विट त्यांनी केलं. 

 

ट्विट करत सोमय्या यांनी सोबत पत्राची प्रतही जोडली. दरम्यान आमदार प्रताप सरनाईक हे क्वारंटाईन झाले आहेत. बाहेर गावाहून आल्यामुळे सरनाईक क्वारंटाईन झालेत. पालिकेचा आपल्याला फोन आल्यामुळं हा निर्णय घेतल्याचं खुद्द सरनाईकांचं म्हणणं असल्याचंही त्यांनी या पत्रात नमूद केलं. तेव्हा आता थेट कोरोना प्रसंगाशीच संपर्क जोडत राऊतांना क्वारंटाईन करण्याबाबत वक्तव्य करणाऱ्या सोमय्यांना राज्य शासनाकडून काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.