Kangana Ranaut On Uddhav Thackeray : 'ते आता कधीच उठणार नाहीत..' धनुष्यबाण गमावल्यानंतर कंगनाने सोडले ठाकरेंवर टीकेचे बाण

Kangana Ranaut On Uddhav Thackeray :  बॉलिवूडची 'पंगाक्वीन' (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहिले. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना नाव (Shiv sena) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर कंगना राणावतने उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टिकेचा बाण सोडला आहे. 

Updated: Feb 18, 2023, 10:26 AM IST
Kangana Ranaut On Uddhav Thackeray : 'ते आता कधीच उठणार नाहीत..' धनुष्यबाण गमावल्यानंतर कंगनाने सोडले ठाकरेंवर टीकेचे बाण title=
Kangana Ranaut On Uddhav Thackeray

Kangana Ranaut On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा निकाल शुक्रवारी (17 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिला. यासोबतच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना गमवावी लागली आहे. अशातच चिन्ह आणि नाव गमावल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत हीने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेचे बाण सोडले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने (BMC) कंगनाचे मुंबईतील तिचे कार्यालय तोडले होते. या कार्यालयाच्या काही भागाचे अनाधिकृत बांधकाम असल्याचे सांगत महापालिकेने प्रशासनाने त्यावर हातोडा चालवला होता. त्यानंतर कंगनाने उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती. यानंतर आज पुन्हा कंगनाने ट्विट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला नसला तरी कंगणाने एकूणच शिवसेना गमावल्यानंतर प्रतिक्रिया दिली असल्याचे दिसून येत आहे. 

वाचा: आता उद्धव ठाकरे 'शिवसेना' हे नाव वापरु शकतात का? 

कंगणा राणावतची उद्धव ठाकरेंवर टिका 

यावेळी कंगनाने ट्विट करत म्हणाली, "वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही," असे टि्वट कंगनाने केले आहे. 

नेमकं प्रकरण काय?

कंगना राणावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद तेव्हा पेटला होता.याची सुरुवात कंगनानं मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी केलेल्या तुलनेपासून झाली. त्यानंतर कंगनानं शिवसेनेला तालिबान आणि बाबराची सेना असे म्हटलं होते.