या घरात २०० उंदीर असताना २ महिला राहतात

पण आता आपण  एक असं घर पाहणार आहोत, ज्या मध्ये माणसांपेक्षा उंदरांची संख्या जास्त आहे..  हे घरं कुठे शेतात नाही तर मुंबईत आहे.

Updated: Sep 4, 2017, 12:05 PM IST
या घरात २०० उंदीर असताना २ महिला राहतात title=

मुंबई : घर म्हटलं की घरातील माणसांबरोबर कीटक, माशी-मच्छर, झुरळं, पाल एखादं उंदीर आपण समजू शकतो.. पण आता आपण  एक असं घर पाहणार आहोत ज्या मध्ये माणसांपेक्षा उंदरांची संख्या जास्त आहे..  हे घरं कुठे शेतात नाही तर मुंबईत आहे.

ही आहे मुंबईतील विलेपार्लेमधील सरस्वती हाऊसिंग सोसायटी. या इमारतीच्या तिस-या मजल्यावर आहे एक विशेष फ्लँट.. या घरात राहतात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल  200 उंदर... कोणाचीही तमा न बाळगता स्वैरपणे हि उंदरं इकडनं तिकडे स्वैरपणे मुक्तसंचार करतात.

घरात प्रकाश येताच ही उंदरं लपून बसतात. त्यामुळे कॅमेरात त्यामानाने खुप कमी उंदीर आपल्या नजरेस पडतात.  तुम्हाला प्रश्न पडला असेल की अखेर ही एवढे उंदीर इथं आली तरी कशी आणि त्यांना कोणी इथून पळवून किंवा मारुन का नाही टाकलं?...तर  यामागे एक कहाणी,

 या फ्लॅटमध्ये 75 वर्षीय शर्वरी आणि त्यांची 42 वर्षीय विधवा मुलगी शुभना राहतात. 2003मध्ये शर्वरीचे पती तर 2006मध्ये शुभनाच्या पतीचं निधन झालं. यामुळे या माय-लेकी खुपच एकट्या पडल्या आणि त्या निराशेच्या गर्तेत गेल्या.

शुभनाच्या पतिची 10 हजार रुपयांच्या पेशंनवर या दोघींची गुजराण होते. आर्थिक चणचण आणि त्यातच त्यांना निराशेनं एवढं घेरलं की साफसफाई करण्याचही त्यांना सूचत नाही. यामुळे या घरावर या उंदरांनी आपला कब्जा केलाय.

या इमारतीत राहणारे सर्वजण या उंदरांमुळे खुपच हैराण आहेत. उंदीर घरांमध्ये येऊ नये म्हणून सर्वांनी आपआपल्या दार-खिडक्यांना मजबूत अशा जाळ्या लावल्या असून संध्याकाळी तर त्यांना दरवाजाही उघडवासा वाटत नाही. 
शेजा-यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या कर्मचा-यांनी जवळपास 60 उंदरांना पकडलय. या घरात उंदीर पकडण्यासाठी एक पिंजराही ठेवण्यात आलाय. मात्र, उदंड संख्येतील हे उदींर पकडण्यात पालिकाकर्मचारीही अपयशी ठरतायत .