अधिकारी असल्याचे सांगून मुंबईत ट्रक चालकांना लुटणाऱ्या दोघांना अटक

एक धक्कादायक बातमी. अधिकारी असल्याचा बाहाणा करत ट्रक चालकांना (truck drivers) लुटण्यात येत होते.  

Updated: Jan 9, 2021, 04:35 PM IST
अधिकारी असल्याचे सांगून मुंबईत ट्रक चालकांना लुटणाऱ्या दोघांना अटक  title=
संग्रहित छाया

मुंबई : एक धक्कादायक बातमी. अधिकारी असल्याचा बाहाणा करत ट्रक चालकांना (truck drivers) लुटण्यात येत होते. सायन-पनवेल महामार्गावर (Sion-Panvel Highway) पालिका अधिकारी असल्याचे सांगून ही लूट सुरु होती. लुटारु ट्रकची तपासणी करायची आहे, असे सांगत ट्रक चालकांना लुटायचे. मानखुर्द पोलीस (Mankhurd Police) ठाण्याच्या हद्दीत सायन-पनवेल महामार्गावर ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर यांना अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या लुटारु दोघांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली. (Two arrested for robbing truck drivers in Mumbai)

सायन पनवेल महामार्गावर रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान दोन युवक दुचाकीहून येऊन त्यांनी ट्रक अडवला आणि आपण मुंबई महापालिकेचे अधिकारी असून कागदपत्राची विचारणा केली. तसेच दमदाटी करत ड्रायव्हरला आणि क्लिनरला मारहाण करणे आणि त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे घेणे, असा प्रकार दोघांकडून करण्यात येत होता. मुंबई महानगर पालिका अधिकारी सांगणाऱ्या दोघांना मानखुर्द पोलिसांनी काही तासात अटक केली आहे. 

दरम्यान ट्रक चालकांच्या ओळखीचे लोक आल्यावर हे दोघे लुटारु पळ काढत असत. त्यासाठी ते नंबर नसलेली दुचाकीचा वापर करत होते. याप्रकरणी या लुटारु दोघांविरुद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याचा छडा लावला. तक्रार केल्यावर रात्रीच पोलसानी दोघांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. पुढील तपास मानखुर्द पोलीस ठाणे करीत आहे.