हृदयाच्या आरोग्यासाठी हा मासा महत्त्वाचा

ट्यूना हा मासा खारट पाण्यात आढळतो, याला टुनी देखील म्हणतात) हा थून्नी या वंशाचा 

Updated: Sep 7, 2020, 07:02 PM IST
 हृदयाच्या आरोग्यासाठी हा मासा महत्त्वाचा title=

मुंबई : ट्यूना हा मासा खारट पाण्यात आढळतो, याला टुनी देखील म्हणतात) हा थून्नी या वंशाचा आहे, जो स्कॉमब्रिडे (मॅकेरल) कुटूंबाचा उपसमूह आहे.  टूना, ओपाह आणि मॅकेरल शार्क ही माशांच्या एकमेव प्रजाती आहेत, जी आसपासच्या पाण्यापेक्षा आपल्या शरीराचे तापमान जास्त राखू शकते. मराठीत याला कुप्पा मासा देखील म्हणतात.

ट्यूना मासा हा चरबी नसलेल्या उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा स्त्रोत आहे. त्यामध्ये पातळ स्नायूंच्या ऊतींच्या वाढीसाठी आणि देखभालीसाठी शरीराला आवश्यक असणारे सर्व आवश्यक अमीनो अॅसिड असतात. ट्यूना हा हार्टसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. 

कारण यात ओमेगा -3 फॅट्टी अॅसिडचा चांगला स्रोत आहे. यात ब्लूफिन ट्यूना हा फार कमी मिळतो, बाजारात त्याला खूप चांगली किंमत आहे.