Trending Video : लोकल (Mumbai Local) ही मुंबईकराची जान आहे. लोकलशिवाय मुंबईकर (Mumbaikar) त्यांचा आयुष्याचा विचार करु शकणार नाही. म्हणूनच काय तर म्हणतात लोकलच्या काट्यावर मुंबईकरांचं आयुष्य अवलंबून असतं. एक लोकल सुटली किंवा रद्द झाली तर दिवसभराचे गणित बिघडतं. सोशल मीडियावर (Social media) लोकलचे अनेक व्हिडिओ (Video) आपण पाहिले आहेत. लोकलमध्ये जागेवरुन महिलांची हाणामारी असो किंवा धावती ट्रेन (train Video) पकडताना अपघात असो. यापूर्वी आपण सोशल मीडियावर मुंबईचे डब्बेवाले यांची स्किल (Skill) पाहिली आहे.
पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Social media video viral) झाला आहे. लोकल स्टेशनवरील हा महिलांचा व्हिडिओ (Women's video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण नक्कीच या महिलांना सलाम ठोकाल. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता महिलांनी काही क्षणात गवताचे अनेक बंडल लोकलमध्ये चढवले.
मुंबईची लोकल ट्रेन काही क्षणासाठी प्लॅटफॉर्मवर (platform) थांबते. तेवढ्या वेळात जवळपास 15 ते 20 गवताचे भलेमोठे बंडल या महिलांनी या सफाईने ट्रेनच्या डब्ब्यात चढवले ते पाहून Time आणि Target Setting चं हे उत्तम उदाहरण आहे असं नेटकरी म्हणतं आहेत. (Trending Video Mumbai Local women Perfect case study for time and target setting viral on Social media)
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर (Twitter) डी के हरी आणि हेमा या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमधील महिलांची स्पीड पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.
Perfect case study for time and target setting. Appreciate Stree Shakti. Recd WA. pic.twitter.com/tDuibOllwE
— D K Hari & Hema (@Bharathgyan) December 7, 2022
या व्हिडिओला आतापर्यंत 3 कोटींपर्यंत व्ह्यूज (Twitter video) मिळाले आहेत. तर या व्हिडिओला 192 वेळा रीट्विट करण्यात आला आहे. स्त्रियांचा कामाचं नेटकरी तोंडभरून कौतुक करत आहेत.