3 महिन्याच्या मुलीची हत्या : आरोपी तृतीयपंथी आहे का? होणार चौकशी

अंगावर काटा आणणारा धक्कादायक प्रकार 

Updated: Jul 14, 2021, 01:28 PM IST
3 महिन्याच्या मुलीची हत्या : आरोपी तृतीयपंथी आहे का? होणार चौकशी  title=

मुंबई : मुंबईतील कफ परेडमधील हत्याकांडाला वेगळं वळण मिळालं आहे. 3 महिन्याच्या चिमुकलीची हत्या करण्यात आली. या हत्येपूर्वी लैंगीक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 9 जुलै रोजी एका तृतीयपंथीयाने चिमुकलीची हत्या केली. आता मुंबईतील कफ परेडमधील हत्याकांडाला वेगळं वळण मिळालं आहे. (Transgender kills 3-month-old in South Mumbai over parents refusal to give blessing money) 

 मुंबईच्या कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतिशय धक्कादायक घटना घडली होती. मुदिखाई म्हणजे बक्षिस दिलं नाही म्हणून 3 महिन्याच्या मुलीची हत्या तृतीय पंथीयांने केली होती. मात्र त्यात आता वेगळेच वळण समोर आले आहे.  हत्येपूर्वी त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे . यावर कफ परेड पोलिसांनी गुन्ह्याच्या कलमात वाढ केली आहे. तसेच आरोपी तृतीयपंथी आहे का? त्याची वैद्यकीय तपासनी केली जात आहे . 9 जुलै रोजी त्या मुलीचा मृतदेह समुद्राच्या बाजूला सापडला होता. 

एका तृतीयपंथीयाने तीन महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केली.  कफ परेडमधल्या आंबेडकर नगर परिसरातील ही घटना असून बक्षीसासाठी तृतीयपंथी मुलीच्या पालकांकडे गेला. एक साडी, एक नारळ आणि अकराशे रुपयांची मागणी त्यानं पालकांकडे केली. पण हालाखिची परिस्थिती असल्यानं मुलीचे पालक ही मागणी पूर्ण करु शकले नाहीत. याचा राग मनात धरून तृतीयपंथी तिथून निघून गेला. 

पण रात्री 2 ते 3 सुमारास या तृतीयपंथीयाने आपल्या पुरुष मित्रासह येऊन मुलीचं अपहरण केलं. अपहरण करुन त्या मुलीला कप परेड इथल्या आंबेडकर नगरच्या मागील खाडीत जिवंत पुरलं. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करत दोनही आरोपींनी अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस स्थानकासमोर काही काल तणाव निर्माण झाला होता. हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. पण पोलिसांनी नरबळीची शक्यता नाकरली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.