लोकलमध्ये गृप प्रवाशांची दादागिरी, व्हिडिओ व्हायरल

विरार चर्चगेट लोकलमध्ये गृप प्रवाशाची दादागिरी सुरूच असल्याचे एका व्हिडीओ वरून समोर आले आहे. चर्चगेट वुन विरार कडे येताना कांदिवली बोरिवली दरम्यान बसलेल्या प्रवाशाना जबरदस्तीने उठविल्या जाते . तर विरार वुन चर्चगेट कडे जाताना जोगेश्वरी अंधेरी दरम्यान उठविल्या जातं. एकादा प्रवाशी उठत नसेल तर त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून, मारहाण ही करण्याची भाषा गृप प्रवाशी करत असल्याचे समोर आले आहे.

Updated: Nov 22, 2018, 08:31 PM IST
लोकलमध्ये गृप प्रवाशांची दादागिरी, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : विरार चर्चगेट लोकलमध्ये गृप प्रवाशाची दादागिरी सुरूच असल्याचे एका व्हिडीओ वरून समोर आले आहे. चर्चगेट वुन विरार कडे येताना कांदिवली बोरिवली दरम्यान बसलेल्या प्रवाशाना जबरदस्तीने उठविल्या जाते . तर विरार वुन चर्चगेट कडे जाताना जोगेश्वरी अंधेरी दरम्यान उठविल्या जातं. एकादा प्रवाशी उठत नसेल तर त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून, मारहाण ही करण्याची भाषा गृप प्रवाशी करत असल्याचे समोर आले आहे.

आज सकाळी विरार वुन 11.52 ला सुटणाऱ्या लोकल मध्येही असाच प्रकार घडला आहे. गोरेगाव ते अंधेरी दरम्यान बसलेला प्रवाशी सीट वरून उठला नसल्याने एका उभ्या प्रवाशाने चक्क आई बहिणीवर शिवीगाळ करीत, बांबूने मारण्याची भाषा केली आहे. शिवीगाळ करतानाचा सर्व प्रकार ज्याला जबरदस्तीने उठविले त्याने मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आहे.

या मुजोर गृप प्रवाशाची एवढी भाईगिरी की व्हिडीओ काडून कुणाला दाखवायचा ते दाखव अशी धमकीही त्यात तो देत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकल प्रवाशाचे लोकल मध्ये काय हाल होतात ये स्पष्ट झाले आहे. अशा भाई प्रवाशावर रेल्वे पोलीस काय कारवाई करतील हे पाहावे लागेल.