माणसाला थेट बोलण्याऐवजी मोबाईलवर बोलणं आवडू लागलंय

भारतीय वर्षातले ७५ दिवसांचा वेळ मोबाईलवर घालवत असल्याचं समोर आलंय

Updated: Dec 24, 2019, 06:47 PM IST
माणसाला थेट बोलण्याऐवजी मोबाईलवर बोलणं आवडू लागलंय  title=

रुचा वझे, झी मीडिया, मुंबई : भारतीय पुरते मोबाईलवेडे झालेत याचा पुरावा एका सर्वेक्षणातून मिळालाय. भारतीय वर्षातले ७५ दिवसांचा वेळ मोबाईलवर घालवत असल्याचं समोर आलंय. थेट बोलण्याऐवजी माणसाला मोबाईलवरच बोलणं आवडू लागलंय. मोबाईल भारतीयांसाठी सर्वकाही झालाय.  मोबाईलनं भारतीयांचं आयुष्य व्यापल्याचा एक धक्कादायक अहवाल समोर आलाय.

भारतीय माणूस वर्षातले ७५ दिवस म्हणजे १८०० तास मोबाईलमध्ये व्यस्त असतो. मोबाईलनं तरुणाईचं सगळं जग व्यापून टाकलंय. ५० टक्के लोकांना मोबाईलशिवाय जगूच शकत नाही असं मत व्यक्त केलं जात आहे. लहान वयातच आता प्रत्येक मुलांच्या हातात मोबाईल असतो. 

त्यामुळे आता विचाराची देवाण-घेवान होताना दिसत नाहीत. परिणामी एकमेकांमध्ये समोरा-समोर होणार संवाद कमी होत आहे. मोबाईलच्या वापरामुळे मुलं आता इंटरनेटच्या जाळ्यात अडकले आहेत. प्रत्येक सोशल मीडिया साइटवर आजची पिढी अग्रेसर असते. 

त्यामुळंच आता व्हॉट्सअॅपवर ग्रूप क्रिएट होऊ लागलेत. माणसाचा माणसाशी थेट संवाद कमी झाला असून तरुणाई आता कुटुंबीयांशी व्हर्च्युअल संवाद साधण्यासाठी उत्सुक असते. परिणामी थेट संवादातला रसच कमी झालाय.

पण एकत्र येऊन गप्पा मारायला कुणालाही वेळ राहिला नाही. मोबाईल ही आता गरज राहिला नसून तो व्यसनाच्याही पलिकडं गेलाय. मोबाईल वापर हा मर्यादित ठेवला नाही. तर भविष्यात भारतात  ठिकठिकाणी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र काढावी लागतील यात शंकाच नाही.