मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद ठेवण्यात येणार आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत धावपट्टी बंद राहणार आहे. मुख्य धावपट्टी सात तास बंद राहणार असल्याने विमानसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर प्रत्येक 65 सेकंदाला एक विमान ये-जा करत असते. त्यामुळं धावपट्टीवर कमालीचा ताण पडतोय. साहजिकच धावपट्टीची वेळच्यावेळी दुरुस्ती होणे गरजेचे असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलंय.