ही नोटीस प्रत्येक प्रतिभावान स्त्रीसाठी - अमृता फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. यावरून पुन्हा एकदा अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाण आमनेसामने आल्या आहेत.  

Updated: Jan 7, 2022, 07:19 PM IST
ही नोटीस प्रत्येक प्रतिभावान स्त्रीसाठी - अमृता फडणवीस title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. यावरून पुन्हा एकदा अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाण आमनेसामने आल्या आहेत.

झी २४ तास सोबत संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण या माझ्याबाबत बोलल्या आहेत. त्यांना मला डान्सिंग डॉल आणि चारित्र्याविषयी बोलून चूक केली आहे. ती त्यांनी मान्य केली तर मला यात पुढे जायचे नाही, असे म्हटले आहे.

तर, विद्या चव्हाण यांनी त्यांची अब्रुनुकसान व्हावे किंवा अपमान व्हावे असे विधान केलेले नाही. डॉल म्हणजे बाहुली. अत्यंत सुंदर, छान असणाऱ्या लोकांसाठी वापरला जाणारा हा शब्द आहे. त्यात जर त्यांना वाईट वाटले असेल तर मी काही करू शकत नाही, असे सांगितले आहे. 

अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाण यांनी एकमेकींना चांगलेच शाब्दिक टोले लगावले आहेत. अमृता यांनी मानहानीची नोटीस पाठविल्यानंतर ट्विटवरून विद्या चव्हाण यांना चांगलेच टोले लगावले आहेत. 

आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण, मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण ! असेही अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर, झी २४ तास सोबत बोलताना अमृता फडणवीस यांनी जर मला असे टोमणे या बाई देऊ शकतात तर यावरून लक्षात येते कि आपल्या सुनेच्या चारित्र्यावर या बाईने कसे टोमणे मारून तिला त्रास दिला असेल. हा मानहानीचा खटला मी माझ्यासाठी करत नाही. हा खटला त्या प्रत्येक प्रतिभावान आणि मल्टी टास्किंग स्त्रीसाठी आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीसाठी आहे कि आजचा अशा बोलण्याने अपमान झाला आहे. आपल्याकडेही काही पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले.  

मी काय चुकीचं बोलले? विद्या चव्हाण यांचा पलटवार

यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या कि, अमृता फडणवीस यांची अब्रुनुकसानी व्हावी किंवा त्यांचा अपमान व्हावा या हेतूने असे काही विधान केले नाही. डॉल म्हणजे बाहुली. अत्यंत सुंदर छान असणाऱ्या लोकांसाठी हा शब्द वापरला जातो. 

हा शब्द त्यांना वाईट वाटत असेल तर मी काही करू शकत नाही. त्यांनी माझ्यावर केस केली आहे. परंतु, बुल्ली बाई म्हणून मुस्लिम महिलांची जी बोली भाजपने लावली त्या महिला नाहीत का ? महिलांची बोली लावली. त्याच्याविषयी अमृता फडणवीस किंवा भाजपने दिलगिरी मागितली आहे का, माफी मागितली आहे का? पहिल्यांदा त्यांनी माफी मागावी. त्यांनी पाठविलेल्या नोटिसीला कोर्टातक उत्तर देईन असे त्यांनी स्पष्ट केले.