कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत हे पर्याय

 मंत्रालयातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य सचिवांनी मंत्रालयातील सर्व विभागाच्या सचिवांना पत्र 

Updated: Feb 24, 2021, 04:12 PM IST
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत हे पर्याय title=

दीपक भातुसे, मुंबई : मंत्रालयातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य सचिवांनी मंत्रालयातील सर्व विभागाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. मंत्रालयात गर्दी वाढत असल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात हे पत्र लिहिले आहेत.

मंत्रालयात येणारे कर्मचाऱ्यांसाठी मुख्य सचिवांनी सुचवले विविध पर्याय

- एक दिवस आड कर्मचारी, अधिकार्‍यांची उपस्थित ठेवावी 
- किंवा आठवड्यातून तीन दिवस उपस्थिती, उर्वरित दिवस सुट्टी 
- किंवा एक आठवडा उपस्थिती एक आठवडा सुट्टी अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना बोलवण्याच्या सूचना

या पर्यायपैकी कोणता पर्याय निवडायचा हा त्या खात्यातील सचिवांनी निर्णय घ्यावा अशी सूचना या पत्रातून करण्यात आली आहे. याचा मंत्रालयातील कामावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. जर संपूर्ण उपस्थिती ठेवून कोविडचे सर्व नियम पाळणे शक्य असेल तर सर्वांची उपस्थिती ठेवण्याचाही पर्याय खुला असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

मंत्रालयात त्यामुळे आता गर्दीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकार देखील याबाबत गंभीर आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार विविध स्तरावर निर्णय घेत आहे.