महाराष्ट्रात वाढला ट्रान्सजेंडेरचा टक्का

राज्यात ट्रान्सजेंडर (तृतियपंथी) मतदारांचा टक्का वाढल्याचे पुढे आले आहे. अर्थात हे ट्रान्सजेंडर पूर्वीपासूनच होते की मतदार यादीत त्यांचा समावेश झाल्यामुळे नेमका आकडा पुढे आला याबाबत निश्चिती नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार राज्यात ट्रान्सजेंटरची संख्या तब्बल दुपटीने वाढल्याचे पुढे आले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 7, 2017, 07:16 PM IST
महाराष्ट्रात वाढला ट्रान्सजेंडेरचा टक्का title=

मुंबई : राज्यात ट्रान्सजेंडर (तृतियपंथी) मतदारांचा टक्का वाढल्याचे पुढे आले आहे. अर्थात हे ट्रान्सजेंडर पूर्वीपासूनच होते की मतदार यादीत त्यांचा समावेश झाल्यामुळे नेमका आकडा पुढे आला याबाबत निश्चिती नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार राज्यात ट्रान्सजेंटरची संख्या तब्बल दुपटीने वाढल्याचे पुढे आले आहे.

निवडणूक आयोगाकडील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यममांमध्ये आलेल्ये वृत्तानुसार राज्यात सध्या १६४५ ट्रान्सजेंडर मतदार आहेत. २०१४च्या मतदार यादीत हीच संख्या ९१८ इतकी होती. त्यापैकी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या ट्रान्सजेंटर्सची संख्या ९७२ इतकी होती.
एकूण आकडेवारीवर नजर टाकता २०१५ मध्ये ही संख्या १०३८ इतकी होती. हीच संख्या २०१६मध्ये वाढली असून, १३९२ इतकी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार राज्यात एकूण १६४५ इतके मतदार आहेत.

वेल्फेअर बोर्ड स्थापन करा

दरम्यान, राज्यात ट्रान्सजेंर्सची संख्या आणखीही वाढणार आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने वेल्फेअर बोर्डाची स्थापना करायला हवी. एकदा का बोर्डाची स्थापना झाली की, त्यानंतर ट्रान्सजेंडर्सचा अचूक आकडा पुढे येऊ शकेल. त्याचा परिणाम ट्रान्सजेंडर मतदारांच्या संख्येत आणखी वाड होईल, असे ट्रान्सजेंडर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

ट्रन्सजेंडर्सकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन

दरम्यान, ट्रान्सजेंटर व्यक्तिमत्वांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलताना दिसत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कांबळे यांची सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी झालेली निवड. माऊली कांबळे हे स्वत: ट्रान्सजेंडर आहेत. संपूर्ण गावाने त्यांना सरपंच म्हणून बहुमताने निवडणून दिले आहे.