मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारत पाडणार

सध्याची मनोरा आमदार निवास ही इमारत पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन आमदार निवास इमारत बांधण्यात येणार आहे. या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी मनोरा पाडली जाणार आहे. त्यासाठी एक फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवास इमारतीमधील कक्ष रिकामे करण्यात येणार आहेत.

Updated: Jan 9, 2018, 08:49 PM IST
मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारत पाडणार title=

मुंबई : सध्याची मनोरा आमदार निवास ही इमारत पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन आमदार निवास इमारत बांधण्यात येणार आहे. या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी मनोरा पाडली जाणार आहे. त्यासाठी एक फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवास इमारतीमधील कक्ष रिकामे करण्यात येणार आहेत.

उच्चाधिकार समितीचा निर्णय

आमदार निवास पुनर्बांधणीसंदर्भात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आमदारांसाठी मुंबईत निवासाकरता नरिमन पॉईंटमधील मोकळ्या जागेत टोलेजंग मनोरा आमदार निवास बांधण्यात आलं होतं. यात 158 आमदारांचे निवासस्थान आहे. प्रत्येक आमदाराला सुमारे 300 चौरस फूटपेक्षा मोठ्या दोन सदनिका देण्यात आल्यात.

आमदार निवासामध्ये अनेक समस्या

मात्र, अवघ्या 25 वर्षात या मनोरा आमदार निवासामध्ये अनेक समस्या पुढे यायला सुरुवात झाली. प्लास्टर निघणे, स्वच्छतागृहातमध्ये पाणी गळती पासून अनेक समस्या पुढे आल्या. त्यातच इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही इमारत दुरुस्त करणे अवघड असल्याचंही समोर आलं. त्यामुळे मनोरा आमदार निवास नव्यानं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.