'द कपिल शर्मा शो' बंद?, सोनी टीव्हीचा मोठा निर्णय

 ‘द कपिल शर्मा शो’ बंद करण्याचा मोठा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे.

Updated: Sep 1, 2017, 12:28 PM IST
 'द कपिल शर्मा शो' बंद?, सोनी टीव्हीचा मोठा निर्णय title=

मुंबई :  ‘द कपिल शर्मा शो’ बंद करण्याचा मोठा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे. कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा धक्का असू शकतो, पण कपिलच्या शोला टीआरपी देखील चांगला राहिलेला नाही.

दुसरीकडे कपिल शर्माच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शोचं चित्रीकरण वारंवार रद्द केलं जात होतं. त्यामुळे चॅनलने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण चॅनल कपिलचा शो कायमचा बंद करणार नसल्याचंही सांगण्यात येत आहे.

कपिल शर्मा सोनी टीव्हीवर पुन्हा कधी दिसणार हे अद्याप चॅनलने स्पष्ट केलेलं नाही. मात्र कपिल शर्माची तब्येत पाहता सोनी टीव्हीने त्याला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे.

कपिल शर्माचा प्रतिस्पर्धी कृष्णा अभिषेक त्याला रिप्लेस करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  कृष्णा अभिषेकचा 'द ड्रामा कंपनी' हा शो, सोनी टीव्हीवर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता दाखवला जाणार आहे.