मुंबई : कोरोनावरील (Coronavirus) भारतीय (India) 'लस'ची मानवी चाचणी (Human corona vaccine will be tested) करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरच या चाचणीला सुरूवात होणार आहे. मुंबई (Mumbai) महानगरपालिकेच्या सायन रूग्णालयात (Sion Hospital) या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. एक हजार व्हॉलेंटिअर्सवर या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
कोरोनावरील भारतीय लसबाबत लवकरच मुंबईतील सायन रूग्णालयात मानवी चाचणी । १ हजार व्हॉलेंटिअर्सवर लसबाबत परिणाम आणि सुरक्षा तपासली जाणार #Coronavirus @ashish_jadhao https://t.co/kpo9phlA1j pic.twitter.com/p7n8SQVOPu
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 12, 2020
हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने ही लस (corona vaccine) विकसित केली आहे. चाचणीसाठी व्हॉलेंटिअर्स मिळावेत यासाठी जाहिरातही दिली जाणार आहे. यामुळे भारतीय लसबाबतची चाचणी करणारे सायन रूग्णालय हे मुंबईतले पहिलं रूग्णालय ठरणार आहे.
आयसीएमआरच्या मदतीने या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यांद्वारे लसबाबत परिणामकारकता आणि सुरक्षा तपासली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात ही चाचणी यशस्वी झाली तर तिचा लवकरच वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यास मदत होणार आहे.