ठाण्यात मुजोर रिक्षाचालकांवर चाप बसवण्यासाठी 'ही' खास योजना

 जवळची भाडी नाकारणं, ग्राहकांशी उद्धट वर्तन, हा रिक्षाचालकांबाबतचा नेहमीचाच अनुभव. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ठाणे वाहतूक शाखेनं स्पेशल स्कॉड तयार केला आहे. हा स्कॉड साध्या वेशात ग्राहक बनून रिक्षाचालकांच्या मुजोरीवर वचक ठेवणार आहे.

Updated: Dec 11, 2017, 09:50 PM IST
ठाण्यात मुजोर रिक्षाचालकांवर चाप बसवण्यासाठी 'ही'  खास योजना  title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : जवळची भाडी नाकारणं, ग्राहकांशी उद्धट वर्तन, हा रिक्षाचालकांबाबतचा नेहमीचाच अनुभव. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ठाणे वाहतूक शाखेनं स्पेशल स्कॉड तयार केला आहे. हा स्कॉड साध्या वेशात ग्राहक बनून रिक्षाचालकांच्या मुजोरीवर वचक ठेवणार आहे.

 
 प्रवासी हैराण 

ठाण्यात जवळपास ३५ हजार रिक्षा आहेत. यातल्या बहुतेक रिक्षाचलाकांचं वर्तन मग्रुरीचं असल्याची प्रवाशांची सर्रास तक्रार आहे. रिक्षाचालकांच्या मुजोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातला पहिलाच प्रयोग ठाणे वाहतूक पोलिसांनी केला आहे. 

कसा असेल स्कॉड ? 

 सहा वाहतूक पोलिसांचा स्पेशल स्कॉड तयार केलाय. हा स्कॉड साध्या वेशात ग्राहक बनून शहरात विविध ठिकाणी रिक्षाचालकांच्या वर्तनावर लक्ष ठेवणार आहेत. जे रिक्षाचालक भाडी नाकारतील तसंच प्रवाशांशी उद्धट वर्तन करतील त्यांच्यावर हे स्पेशल स्कॉड कारवाई करणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा स्कॉड दर १५ दिवसांनी बदलणार आहे. अशाच प्रकारे एक महिला स्पेशल स्कॉडही नेमला जाणार आहे. 

 

३०० रिक्षाचालकांवर स्कॉडने केली  कारवाई 

 

 गेल्या तीन दिवसांत जवळपास ३०० रिक्षाचालकांवर अशा प्रकारे या स्कॉडने कारवाई केली आहे. संपूर्ण राज्यात ठाणे वाहतूक विभाग असा प्रयोग करणारा पहिला विभाग ठरला असून, या प्रयोगामुळे मुजोर रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर या मोहिमेचा चांगला परिणाम ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे हे नक्की.