Shivsena Symbol : शिवसेनेतील फूट ही काल्पनिक; ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद

महेश जेठमलानी यांचे आरोप खोडून काढत  शिवसेनेतील फूट ही काल्पनिक असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला आहे.  शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याची दावा देखील कपिल सिब्बल यांनी केला आहे.  शिंदे गटाची अनेक प्रतिज्ञापत्र बोगस आहेत असा युक्तीवाद देखील त्यांनी केला.  

Updated: Jan 17, 2023, 05:06 PM IST
Shivsena Symbol :  शिवसेनेतील फूट ही काल्पनिक; ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद title=

Shiv Sena Symbol Row LIVE :   संपूण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण  (Shiv Sena Symbol) निवडणुक आयोगासमोर सुनावणी  (Election Commission India)  सुरु आहे. ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी मोठा युक्तिवाद केला.  शिवसेनेतील फूट ही काल्पनिक असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. 
 

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी मागील सुनावणीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रित होती. पण, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या घटनेत बदलत करत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले असा दावा  करत  जेठमलानी यांनी  पक्षाची रचना काय हे वाचून दाखवली होते. बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा खोटारडेपणा आहे. त्यामुळे  उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत असं महेश जेठमलानी म्हणाले होते.  

महेश जेठमलानी यांचे आरोप खोडून काढत  शिवसेनेतील फूट ही काल्पनिक असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला आहे.  सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत प्रतिक्षा करा, कोणतीही सुनावणी घेऊ नका अशी मागणी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तसेत शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याची दावा देखील कपिल सिब्बल यांनी केला आहे.  शिंदे गटाची अनेक प्रतिज्ञापत्र बोगस आहेत असा युक्तीवाद देखील त्यांनी केला.  

शिंदे गटाची खरी शिवसेना नसून पक्षात फूट पडली आहे ही केवळ कल्पना आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. सेनेतील फुटीला काहीही अस्तित्व नाही, असं सांगतानाच आपल्या विधानांचा पाठपुरवठा करणारी कागदपत्रं सिब्बल यांनी सादर केली. काही लोकांना घेऊन पक्षातून बाहेर पडणं बेकायदेशीर आहे. यामुळेच शिवसेनेतील फूट ही काल्पनिक असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी  फूट पडली. जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे शिवसेनतून बाहेर पडले. मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडल्याने फक्त पक्षातच नाही तर राजकारणात मोठा भूकंप आला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले. शिंदे विरुद्ध ठाकरे असा सत्ता संघर्ष महाराष्ट्रात सुरु झालाय.