राज्यातील शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा घाट; तावडे अडचणीत

विरोधकांनी तावडेंवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे.

Updated: Sep 21, 2018, 10:24 PM IST
राज्यातील शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा घाट; तावडे अडचणीत title=

मुंबई: शिक्षण विभागाने घेतलेल्या एका निर्णयामुळे या खात्याचे मंत्री विनोद तावडे वादात सापडले आहेत. शिक्षण विभागाने नुकताच राज्यातील शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. 'वंदे गुजरात' असे या वाहिनीचे नाव आहे. यावरून विरोधकांनी तावडेंवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. 
 
 शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांनी भविष्यात महाराष्ट्राचा नावाचा उल्लेख 'गुजराष्ट्र' म्हणून केला तर आर्श्चर्य वाटणार नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
 
 शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी 'सह्याद्री' वाहिनीला डावलून 'वंदे गुजरात' या वाहिनीची निवड केली आहे.

या अभ्यासक्रमासाठी संबंधित विषय महाराष्ट्रात ही दूरचित्रवाहिनी दिसत नसल्यामुळे त्यासाठी शाळेत 'डिश सेटटॉप' बॉक्स बसवावा किंवा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी 'जिओ टीव्ही' अ‍ॅपमधील 'वंदे गुजरात' वाहिनी बघावी, असे आदेशात म्हटले आहे. ज्या शाळांमध्ये टीव्ही नाही, अशा शिक्षकांना इतर शाळेत जाऊन प्रशिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे.